रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा निकाल 2024, राऊतांचा पराभव करत नारायण राणेंनी मारली बाजी

RATNAGIRI SINDHUDURG Lok Sabha Election Result 2024: राज्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हायहोल्टेज लढतीपैकी एक होता. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक विनायक राऊत यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळाली.

RATNAGIRI SINDHUDURG Lok Sabha Election Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झालाय. 24 व्या फेरीअखेर नारायण राणे 51 हजार 894 मतांनी आघाडीवर होते. नारायण राणे पाचव्या फेरीनंतर 4239 मतांनी आघाडीवर आहेत. पाचव्या फेरीनंतर विनायक राऊत पिछाडीवर पडले आहेत. राज्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हायहोल्टेज लढतीपैकी एक होता. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक विनायक राऊत यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळाली. नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शिवाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नारायण राणेंसाठी सभा घेतली होती, त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (UBT) महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत (Vinayak Bhaurao Raut) यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने येथून नारायण राणे (Narayan Tatu Rane) यांना तिकीट दिले आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची फ्लॅशबॅक आकडेवारी

- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक भाऊराव राऊत (उद्धव ठाकरे) विजयी झाले होते.

- विनायक राऊतवर तीन गुन्हे दाखल. त्यांनी आपली संपत्ती 5.06 कोटी असल्याचे जाहीर केले होते. 28.30 लाखांचे कर्ज होते.

- 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विनायक भाऊराव राऊत यांनी ही जागा जिंकली होती. त्यावेळी त्याच्यावर 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

- पदव्युत्तर पदवीधर विनायक यांनी त्यांची संपत्ती 4.45 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते. 23.70 लाखांचे कर्ज होते.

- 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ.निलेश नारायण राणे येथून खासदार झाले.

- नीलेशवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडे 3.05 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती होती.

- 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले होते.

- 12वी पास अनंत गीते यांच्याकडे 55.18 लाख रुपयांची संपत्ती होती.

टीप: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 1455577 मतदार होते, तर 2014 मध्ये मतदारांची संख्या 1367362 होती. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत 458022 मते मिळवून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश नारायण राणे यांचा पराभव केला. राणे यांना 279700 मते मिळाली. त्याचवेळी 2014 च्या निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत विजयी झाले होते. विनायक भाऊंना 493088 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार निलेश नारायण राणे यांना 343037 मते मिळाली.

 

Read more Articles on
Share this article