2 दुचाकींच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ

Published : May 19, 2024, 07:49 PM IST
accident news 02.jpg

सार

तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. यात एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी असून त्यास तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दुचाकीवरुन चारजण प्रवास करत होते, मात्र तेल्हारा-बेलखेड मार्गावर आल्यानंतर दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एका दुचाकीचा भुगा झाल्याचं रस्त्यावर पडलेल्या वस्तूंवरुन दिसून येत आहे.

अपघातील मृतांमध्ये दोन तरुणी आणि एका महिलेचा समावेश आहे. तर, जखमीला तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेतील मृत दोन्ही तरूणी एकाच कुटूंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

 

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Pune Metro : पुण्यात २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पांचं पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन
'मराठी माणसाचा पक्ष गुजराती व्यापाऱ्यांच्या चरणी', राऊतांचा राष्ट्रवादीवर घणाघात