ईडीचा मंगलदास बांदल यांच्या घरावर छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना बँक फसवणूक प्रकरणी ईडीने अटक केली आहे. ईडीने बांदल यांच्यासह अन्य तिघांच्या पुण्यातील मालमत्तांवर छापे टाकून कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत.

vivek panmand | Published : Aug 21, 2024 8:11 AM IST

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना काल रात्री ईडीने अटक केली. बँक फसवणूक प्रकरणी ईडीने यापूर्वी 4 वेळा मंगलदास बांदल यांची चौकशी केली होती, काल ईडीने मंगलदास बांदल आणि अन्य तिघांच्या पुण्यातील मालमत्तांवर छापे टाकले आहेत. पुण्यात सहा ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. यंदा वंचित बहुजन आघाडीकडून 2024 लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला मात्र काही कारणास्तव उमेदवारी रद्द करण्यात आली. ईडीने छापे टाकून कोटय़वधी रुपयेही जप्त केले आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर येथील निवासस्थानावर ईडीची ही दुसरी कारवाई आहे. पुण्यातील हडपसर आणि शिक्रापूर येथील दोन्ही घरांवर कारवाई सुरू असून घरातील सर्व सदस्य घरात असल्याची माहिती आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल या मंगलदास बांदल यांच्या पत्नी आहेत. बांदल यांचा भाऊ व पत्नी शिक्रापूर येथे राहतात तर मंगलदास बांदल व त्यांचा पुतण्या हडपसर येथे राहतात. मंगलदास बांदल हे लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुक असतानाच ते विधानसभा निवडणुकीसाठी उभं राहण्याचा विचार करत होते. 
आणखी वाचा - 
अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, SIT प्रमुख आरती सिंह बदलापुरात दाखल

Share this article