शहापूरमध्ये डोंगरावर ड्रोन कोसळला; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

Published : May 15, 2025, 10:30 PM IST
drone 2

सार

शहापूर तालुक्यातील फुगाळे गावात एक ड्रोन डोंगरावर कोसळला. खेळणाऱ्या मुलांना ड्रोन सापडल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक तपासात हा ड्रोन जलसंपदा विभागाच्या सर्वेक्षणासाठी वापरला जात असल्याचे समोर आले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील फुगाळे गावात गुरुवारी (१५ मे) दुपारी २ वाजता एक ड्रोन डोंगरावर कोसळल्याची घटना घडली. डोंगरावर खेळत असलेल्या लहान मुलांना हा ड्रोन आढळून आला. त्यांनी तो गावात आणल्यावर ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. ड्रोन कोसळल्याची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा ड्रोन जलसंपदा विभागाच्या वाडा तालुक्यातील सर्वेक्षणासाठी वापरला जात असल्याचे समोर आले. 

पायोनियर इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने ड्रोनच्या मदतीने सर्वेक्षण सुरू केले होते. सर्वेक्षणादरम्यान ड्रोन रेंजच्या बाहेर गेल्याने तो कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे

PREV

Recommended Stories

Nagpur Smart City Case : स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढेंना क्लीन चिट; ईओडब्ल्यू व पोलिसांचा अहवाल विधानसभेत सादर
BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात