Ashok Kharat Case : ‘अंकशास्त्रज्ञ’ अशोक खरात गणितात नापास! शैक्षणिक वास्तव समोर आल्याने चर्चांना उधाण

Published : Mar 25, 2026, 09:45 AM IST
Ashok Kharat Case

सार

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या शैक्षणिक नोंदींनुसार तो दहावीच्या परीक्षेत गणित आणि समाजशास्त्र या विषयांत नापास झाला होता. तरीही त्याने स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध केले होते. या विरोधाभासामुळे त्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Ashok Kharat Case : जन्मतारीख ऐकून भविष्य सांगणारा आणि स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात सध्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत आहे. मात्र, आता त्याच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकांना अंकशास्त्र शिकवणारा खरात दहावीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झाल्याचे उघड झाले असून, यामुळे समाजात मोठी चर्चा रंगली आहे.

दहावीमध्ये गणितात अपयश

सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) हे अशोक खरातचे मूळ गाव आहे. ग्रामीण पार्श्वभूमीत वाढलेल्या खरातने वावी येथील माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. मार्च १९८३ मध्ये त्याने दहावीची परीक्षा दिली होती. त्यावेळी शाळेच्या नोंदींमध्ये त्याचे नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असे होते. गुणपत्रिकेनुसार, त्याला गणितात केवळ २८ गुण मिळाले होते, तर समाजशास्त्रातही तो अपयशी ठरला होता. एकूण २५१ गुणांसह त्याची टक्केवारी ३५.८६ इतकी होती.

‘कॅप्टन’ आणि १५४ देशांचा दावा

शैक्षणिक आयुष्यात साधा विद्यार्थी असलेल्या खरातने पुढे स्वतःला ‘कॅप्टन’ अशी ओळख दिली. जन्मतारीख पाहून अंकशास्त्र सांगणे, भविष्य वर्तवणे आणि १५४ देश फिरल्याचा दावा करत त्याने स्वतःची वेगळी प्रतिमा तयार केली. अनेक लोक त्याच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले होते.

नावातही बदल

अशोककुमार खरात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे शाळेतील मूळ नाव ‘लक्ष्मण’ होते. १९९५ मध्ये त्याने शाळेतून दाखला काढला होता. त्यानंतर गॅझेटच्या माध्यमातून नाव बदलून ‘अशोककुमार खरात’ केले असावे, अशी माहिती समोर येत आहे.

वास्तव समोर आल्याने चर्चांना उधाण

अंकशास्त्राचा दावा करणारी व्यक्ती गणितातच नापास असल्याची बाब समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ग्रामीण भागातील एक विद्यार्थी पुढे ‘अंकशास्त्रज्ञ’ कसा बनला, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. त्याच्या दाव्यांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'