रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेटमध्ये डॉ. तावरे सहभागी, तपास यंत्रणेच्या हाती पुरावे

Published : May 24, 2025, 12:00 PM IST
AJAY TAVARE

सार

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी ट्रान्सप्लांट घोटाळ्यात ससून रुग्णालयाचे निलंबित वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांचे नाव समोर आले आहे. 

पुणे | प्रतिनिधी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी ट्रान्सप्लांट घोटाळा आता अधिक गडद होत चालला आहे. या प्रकरणात संशयाच्या फेऱ्यात सापडलेले नाव म्हणजे ससून रुग्णालयाचे निलंबित वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शहरात गाजलेल्या पोर्शे अपघात प्रकरणातही यांचं नाव चर्चेत आहे.

वैद्यकीयदृष्ट्या गंभीर गैरव्यवहार? 

रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या एका मूत्रपिंड प्रत्यारोपणात संबंधित पेशंट आणि दात्यामध्ये नात्याचा खोटा पुरावा सादर करण्यात आला होता, असा आरोप आहे. याप्रकरणात आता पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्रस्तावित डोनर व प्राप्तकर्ता यांच्यात नातं नसल्याची खात्री झाल्याने, संपूर्ण शस्त्रक्रियेबद्दल संशय निर्माण झाला आहे.

डॉ. अजय तावरे यांचं नाव समोर कसं आलं? 

ससून रुग्णालयाचे निलंबित अधीक्षक डॉ. अजय तावरे हे या किडनी ट्रान्सप्लांटच्या कागदपत्रांची वैधता तपासणाऱ्या समितीचा भाग होते. त्यांच्या स्वाक्षऱ्या आणि नोंदी तपासून, त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मान्यता दिली असल्याची शक्यता पोलिस तपासातून समोर आली आहे.

दोन गंभीर प्रकरणांमध्ये एकाच नावाचा उदोउदो? 

डॉ. अजय तावरे यांचं पोरशे अपघात प्रकरणात डॉक्टर रिपोर्टस फेरफारप्रकरणी नाव चर्चेत होतं. आता या नव्या किडनी ट्रान्सप्लांट घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर गंभीर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

पोलिस तपासाचा वेग वाढला 

या प्रकरणात पुणे पोलिसांनी रुबी हॉल क्लिनिक, संबंधित रुग्ण, डोनर, आणि दस्तऐवजांची सखोल चौकशी सुरू केली आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि वैद्यकीय सल्लागारांचा सहभाग घेऊन, शस्त्रक्रियेमागे कोणाचा फायदा आणि कोणाची फसवणूक झाली, हे शोधण्यावर भर दिला जात आहे. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती