मंत्री धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळला होता. या प्रकरणामुळे मुंडे हे अडचणीत सापडले आहेत. आता या प्रकरणाकडे परत एकदा सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांमध्ये चांगला संबंध होते, त्यामुळे कराड याच्यावर कारवाई करण्यात उशीर होत असल्याचे सांगण्यात येत होत. आता कराड हा प्रमुखच आरोपी असल्यामुळे तो मास्टरमाइंड असल्याचं दिसून आलं आहे. आज धनंजय मुंडे हे राजीनामा देतील का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले असून हत्या कशी करण्यात आली याबद्दलची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.