Covid JN1 Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका, मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत नागरिकांना मास्क वापरण्याचे केले आवाहन

Covid JN1 Variant : देशासह राज्यात जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. 

Harshada Shirsekar | Published : Dec 22, 2023 8:28 AM IST / Updated: Dec 22 2023, 02:52 PM IST
15
कोरोनाचा नवा व्हेरिएंट

Coronavirus Updates : देशासह राज्यात जेएन-वन (Covid JN1) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीमध्ये राज्यातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावे. तसंच हॉस्पिटलमध्ये विलगीकरण (Isolation) आणि ऑक्सिजन बेड्सची (Oxygen Beds) यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. 

तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. दुसरीकडे राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याचीही ग्वाही देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

25
लसीकरणाचा आढावा घ्यावा - मुख्यमंत्री

व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यानी ही बैठक घेतली. या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant), वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ( Medical Education Minister Hasan Mushrif), मुख्य सचिव मनोज सैनिक यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अन्य संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी होते.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ऑक्सिजन प्लाँट्स (Oxygen Plants), व्हेंटिलेटर(Ventilators), ऑक्सिजन पाइपलाइन्स (Oxygen Pipelines), आरटीपीसीआर लॅब (RTPCR Lab), लिक्विड ऑक्सिजन प्लाँट (Liquid Oxygen Plant) यासह महत्त्वाच्या अन्य सर्व बाबी सुस्थितीत आहेत का? याची तपासणी करावी. लसीकरणाचा आढावा घ्यावा, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

35
'नागरिकांनी मास्कचा वापर करावा'

लस आणि औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोव्हिड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स (ICU), व्हेंटिलेटर बेड्ससंदर्भातील यंत्रणेची माहितीही यावेळी घेतली.

मास्क वापरण्याचे आवाहन

सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी. आगामी काळातील सण आणि नववर्षाचे स्वागत (New Year Celebration) या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.

45
‘चुकीची माहिती पसरवू नका’

सोशल मीडियावर (Social Media) तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम अथवा भीती निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाही;यासाठी अधिकृत माहितीचाच उपयोग करून सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

'जनतेने घाबरू नये'

शासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे. यंत्रसामग्री, औषध साठा, इतर साधनसामग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने घाबरू नये. काळजी घ्यावी काळजी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

55
राज्यात कोरोनाचे एकूण 45 रुग्ण

राज्यात सध्या 63 हजार विलगीकरण बेड्स, 33 हजार ऑक्सिजन बेड्स, 9 हजार 500 आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. तसेच मुंबईत 27, पुण्यात आठ, ठाण्यात आठ, कोल्हापूर-रायगडमध्ये प्रत्येकी एक असे राज्यभरात कोरोनाचे एकूण 45 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिली आहे.

आणखी वाचा :

इन्फ्लूएंझा किंवा सीझनल फ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे व काय करू नये?

Parking Rules : मुंबईत अवैधरित्या गाडी पार्क करणाऱ्यांवर होणार कारवाई, महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Deep Cleaning Drive : मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेसाठी जुहू चौपाटीवर स्वतः चालवलं क्लिनिंग मशीन

Share this Photo Gallery
Recommended Photos