CJP Protest : 'सदाभाऊ खोतांना बोलताना लाज वाटली पाहिजे', असं का म्हणाले विद्यार्थी?

Published : Jul 21, 2026, 12:47 PM IST
Sadabhau Khot

सार

नीट पेपरफुटी प्रकरणातील कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळाले. यावरुनच आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव केलं आहे.

मुंबई : नीट पेपरफुटीवरुन सध्या आंदोलन पेटले आहे. आजही दिल्लीत मोजक्याच संख्येने आंदोलनाच्या ठिकाणी शेकडो आंदोलक जमले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तवे केली आहेत. त्यांच्या वक्तव्यावरुन सध्या संताप व्यक्त केला जात आहे.

नक्की काय म्हणाले सदाभाऊ खोत?

सदाभाऊ खोत म्हणाले की, या संपूर्ण प्रकारामुळे देशात अशांतता माजवण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. दिल्लीतील आंदोलनात इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करू पाहत आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत. पण शिक्षण खात्यात धर्मेंद्र प्रधान आहेत. त्यांचा राजीनामा घेऊ नये. कारण या आतंकवाद्यांना (आंदोलनकर्त्यांना) जशास तसं उत्तर द्याव. खरंतर, अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. हा देश प्रगतीपथाच्या दिशेने जात आहे. पण हे त्या अतृप्त आत्म्यांना सहन होत नाहीये. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सदाभाऊंनी आतंकवाद्याची उपमा दिल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

सीजेपीच्या आंदोलनासाठी देशभरातून आलेली सर्व मुलं शिक्षणाच्या मुद्द्यासाठी लढणारी होती. भाजपा केवळ देशभक्त बाकी कोणीही नाही का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थितीत केला. सदाभाऊ ज्या तरुणांना आतंकवादी, देशद्रोही म्हणतायत त्यांना रस्त्यावरच विचारले पाहिजे मत घेताना लाज वाटली नाही का? हे अत्यंत चुकीचे आहे. लोक तुम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर देतील. खरंतर, आंदोलनावेळी आमच्या एका हातात पुस्तक आणि गुलाब होत. लाठीकाठी नव्हती असेही आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी म्हटले.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

अंजली दमानिया यांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर आपलं मतं मांडल. अंजली दमानिया म्हणाल्या की, सत्ता काय करू शकते हे सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यातून दिसून येते. जो व्यक्ती आयुष्यभर केवळ सो कॉल्ड शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होता, त्याच्याकडे आता सत्ता आल्यानंतर काय वागतो हे आपल्याला दिसतेय. आंदोलन करून मागण्या करणारे खोत आता अशी भूमिका घेतात. त्या व्यक्तीला शिक्षणाचा अर्थच कळत नाही किंवा त्यांना आता आंदोलनाचा विसर पडला आहे. अशा माणसांना टीव्हीवर दाखवू नये. त्यांच्या आंदोलनाची परिभाषा बदलेली आहे.

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

राजू शेट्टींनीही सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले की, ज्यावेळी मावळचे आंदोलन झाले होते त्यावेळी सदाभाऊंनी केलेली भाषणे स्वत: ऐकावीत. त्यानंतर आता आंदोलन करणाऱ्या पोरांच्या बाबतीत वक्तव करावीत. नीट (NEET) असो किंवा सीईटीचा पेपर फोडण्यामागे भाजपा आणि आरएसएसची लोक आहेत. एकूणच राजू शेट्टी यांनी भाजपा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही टीका केली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ganeshotsav: सीमेवरही दगडूशेठ गणपतीचा जयघोष, जवानांसाठी पुण्यातून बाप्पा रवाना!
Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान या 6 जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता