लहानपणी आईने लावलेल्या शिस्तीमुळे झालो आयुष्यात यशस्वी, भावनिक पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर एका पोस्टमुळे आईच्या मारहाणीबाबत चर्चा सुरू झाली आहे. लहानपणी आईने मारहाण करून शाळेत पाठवल्यामुळे आता यशस्वी झाल्याचे अनेकजण सांगत आहेत.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसून येतात. यामध्ये भावनिक स्वरूपाचे असणारे व्हिडीओ लवकर व्हायरल होतात. त्याच प्रकारचा एक व्हिडीओ आता परत एकदा व्हायरल होताना दिसून आला आहे. आई लहानपणी मुलांना मार खाऊन शाळेला पाठवत असायची, त्या वेळी मुलांना आईच महत्व समजत नव्हतं पण आता ते कळायला लागलं आहे. आईने शाळेत पाठवल्यामुळे शिकता आल्याचं अनेकांनी सांगितलं असून पोस्टमध्ये तेच म्हटलेलं आहे. 

पोस्टमध्ये काय म्हटलं आहे? - 
आई लहानपणी शाळेत-क्लासला जाण्यासाठी काचकूच केली की मारत मारत पाठवायची. तेंव्हा खूप राग यायचा आईचा, पण उच्च शिक्षण घेतल्यानंतर, आज देशविदेशात व्यवसायानिमित्त विमानाने फिरताना, लक्झरीयस लाईफ एन्जॉय करताना, बायको-मुलाबाळांच्या, कुटुंबाच्या एकून एक इच्छा पूर्ण करताना, त्या माराचं महत्व कळतं. अशा आशयाची पोस्ट एक्स या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. 

पोस्टवर आला कमेंटचा महापूर - 
या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर कमेंट्स आल्या असून आईने लहानपणी मारल्यामुळं आम्ही मोठेपणी घडल्याचं अनेकांनी कबूल केलं आहे. एका युझरने पहिल्यांदा मुलांना मारल्यावर मोबाईलमुळे आता काम होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

Share this article