Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’साठी मोठा इशारा, ई-केवायसीसाठी फक्त एक दिवस शिल्लक

Published : Dec 30, 2025, 06:56 PM IST

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबरला संपत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील हप्ते मिळण्यात अडथळा येऊ शकतो. सरकारने महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केलंय.

PREV
16
ई-केवायसीसाठी फक्त एक दिवस शिल्लक

मुंबई : राज्य सरकारची सर्वाधिक चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यातच आता ई-केवायसीची अंतिम मुदत 31 डिसेंबरला संपत असल्याने लाखो महिलांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या राज्यभरात सुमारे 45 लाख महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ते मिळण्यात अडथळा येऊ शकतो, असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे, त्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

26
ई-केवायसीसाठी शेवटची संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्याने प्रशासनाकडून हालचाली वाढल्या आहेत. अजूनही लाखो महिलांची ई-केवायसी प्रलंबित असल्याने राज्यभरातून या मुदतीला आणखी काही दिवसांची किंवा महिन्याची वाढ देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून ई-केवायसीसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

36
विशेष लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था

या योजनेअंतर्गत पती किंवा वडील दोन्हीही नसलेल्या महिलांची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच, अर्ज प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्याची लाभार्थी महिलांना अखेरची संधी दिली जाणार आहे. विधवा महिला किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

46
13 स्तरांवर पडताळणी, गैरप्रकारांना आळा

लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरच गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून ओळख पडताळणी केली जात आहे. या योजनेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून १३ विविध स्तरांवर पडताळणी प्रक्रिया राबवण्यात येत असून, त्यामुळे योजना अधिक पारदर्शक बनल्याचे शासनाचे म्हणणे आहे. 

56
कोणाला मिळतो लाभ?

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक

पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा

पुढील हप्त्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक

आतापर्यंत अनेक हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले असून, पुढील हप्त्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करणे आता अत्यावश्यक आहे. 

66
31 डिसेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहावा यासाठी 31 डिसेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी महिलांनी विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories