
Chhatrapati Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजी नगर येथील आझाद चौकात भीषण आग लागल्याच्या दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत 100 हून अधिक फर्निचर दुकाने जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेनंतर तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
इन्सपेक्टर दिलिप यांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्निचरच्या दुकानांना भीषण आग लागली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. सध्या आगी आटोक्यात आणण्यात आली आहे. याशिवाय आग विझवण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, याआधीही जानेवारी महिन्यात संभाजी नगरमधील चेलीपुरा परिसरातील महावीर घरसंसार मॉलला मध्यरात्री भीषण आग लागली होती. आगीने संपूर्ण मॉलला वेढा घातला होता. यामुळे आजूबाजूच्या काही दुकानांनाही लाग लागली गेली. या आगीच्या दुर्घटनेमध्ये कोट्यावधींचे नुकसान झाले होते.