
परभणी | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षात (भाजप) विदर्भात अंतर्गत कलगजीरतेचा नवीन अध्याय समोर आला आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार किशोर जॉर्जवार यांच्यातील मतभेद आता केवळ पक्षाच्या चार भिंतीआत मर्यादित न राहता, खुलेआम माध्यमांत झळकू लागले आहेत. हे प्रकरण भाजपमधील अंतर्गत समस्यानां अधिक अधोरेखित करत आहे.
चंद्रपूरच्या राजकारणात एकेकाळी एकत्र काम करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये आता उघड संघर्ष दिसू लागला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून विधानसभेच्या रणनीतींपर्यंत अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये परस्पर विरोधी भूमिका घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावरील नेतृत्व गोंधळात सापडलं आहे.
भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या वादामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. जॉर्जवार गटाला वाटतं की त्यांचा दबदबा टिकवण्यासाठी पक्षात सत्तेचं संतुलन हवं, तर मुगंटिवार समर्थक त्यांच्यावर “स्वतःचं राज्य” चालवण्याचा आरोप करत आहेत.
या सगळ्याचा केंद्रस्थानी आहे "पक्षशिस्त". पण प्रत्यक्षात ही चकमक सत्ताकेंद्राच्या वर्चस्वाच्या लढाईचं प्रतीक बनली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोण गट प्रभावशाली ठरणार – हाच खरा संघर्ष आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
भाजपसाठी ही फाटाफूट चिंतेची बाब ठरत आहे, विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर. कार्यकर्त्यांचं मनोबल आणि मतदारांमध्ये संदेश – दोन्ही पातळ्यांवर या संघर्षाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.