Central Railway special train schedule: लग्नसराई, परीक्षांच्या हंगामातील गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी २४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, कोकण यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर धावणारय.
रेल्वे प्रवाशांना गुड न्यूज! लग्नसराई आणि गर्दीसाठी धावणार २४ 'स्पेशल' ट्रेन
मुंबई : सणासुदीचे दिवस, लग्नसराईचा धमाका आणि परीक्षांचा हंगाम लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांची चिंता मिटवली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोकण यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर होणारी गर्दी पाहता, रेल्वे प्रशासनाने २४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 'वेटिंग लिस्ट'च्या कटकटीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रामुख्याने CSMT, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि सावंतवाडी या शहरांना जोडणाऱ्या या गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
28
१. मुंबई – कोल्हापूर – मुंबई स्पेशल (०६ फेऱ्या)
कोल्हापूरकरांच्या सोयीसाठी ही गाडी विशेष धावेल.
ट्रेन क्र. ०१०२९: १३, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी मुंबई (CSMT) हून दुपारी १४:३० ला सुटेल.
ट्रेन क्र. ०१०३०: १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून दुपारी १५:५५ ला सुटेल.
ट्रेन क्र. ०२१३९: १९ फेब्रुवारीला मुंबईहून पहाटे ००:२० ला निघून दुपारी १५:३० ला नागपूरला पोहोचेल.
ट्रेन क्र. ०२१४०: १७ फेब्रुवारीला नागपूरहून रात्री २०:०० ला सुटेल.
58
४. एलटीटी (कुर्ला) – नागपूर स्पेशल (०४ फेऱ्या)
ट्रेन क्र. ०१०२१: १४ आणि २१ फेब्रुवारीला कुर्ल्याहून (LTT) पहाटे ००:५५ ला सुटेल.
ट्रेन क्र. ०१०२२: त्याच दिवशी रात्री २०:०० ला नागपूरहून परतीसाठी निघेल.
68
५. पुणे – नागपूर सुपरफास्ट स्पेशल (०६ फेऱ्या)
ट्रेन क्र. ०१४६७/०१४१९: १३, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी पुण्याहून दुपारी १५:५० ला सुटेल.
ट्रेन क्र. ०१४६८/०१४२०: १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी नागपूरहून सकाळी ०८:०० ला सुटेल.
78
गाडीची रचना (Coach Composition)
प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाड्यांमध्ये सर्व प्रकारचे डबे असतील.
AC डबे: १ प्रथम श्रेणी, १ द्वितीय श्रेणी आणि २ तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे.
स्लीपर: ५ शयनयान डबे.
जनरल: ६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि गार्ड व्हॅन.
88
तिकीट बुकिंग कोठे कराल?
या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व रेल्वे स्थानकांवरील PRS काउंटरवर आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले आहे. ज्यांना जनरल तिकीट हवे आहे, ते UTS ॲप द्वारे तिकीट काढू शकतात.
टीप: गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी आपले आरक्षण वेळेत करून घ्यावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.