Budget Session Update : अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
Budget Session Update : राज्य सरकार शुक्रवारी आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या योजनांची माहिती सुत्रांनी दिली आहे. या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांच्या योजनांची छाप आहे. 28 जूनला दुपारी अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील. आगमी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने यामध्ये मोठ्या योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण, युवा कौशल्य, अन्नपूर्णा योजना अशा महत्वााचा योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात कोणकोणत्या योजना?
1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
उद्देश - आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणि जीवनमान सुधारणे
लाभार्थी - 21 ते 60 वयोगटातील महिला
अट- 2,50,500 पेक्षा कमी उत्पन्न
सुमारे - 3 कोटी 50 लाख महिलांना लाभ अपेक्षित
दरमहा - 1500 रुपये
2. मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना
12 वी पास -7000 रुपये
आयटीआय डिप्लोमा - 8000 रुपये
पदवीधर -9000 रुपये
वयोगट- 18 ते 29 वर्षे
3. अन्नपूर्णा योजना
दरवर्षी तीन सिलिंडर मोफत
सर्व महिलांना लागू
4. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना
कृषी पंपांना विनामूल्य वीज
7.5 एचपी मोटर्स असलेल्या छोट्या, मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज देणार
44 लाख शेतकऱ्यांना फायदा
8.5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप देणार
एकूण -52 लाख 50 हजार लाभार्थी
आणखी वाचा :