काँग्रेस पक्ष जेवढा रिकामा कराल तेवढा तुमचाच फायदा, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाची चर्चा

Published : May 05, 2025, 01:28 PM IST
Chandrashekhar Bawankule

सार

काँग्रेस पक्ष जेवढा रिकामा कराल तेवढा तुमचाच राजकीय फायदा असेल असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. याच विधानावरुन चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Politics : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सध्या केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, काँग्रेस पक्ष खाली करा. कारण हा पक्ष जेवढा रिकामी कराल तेवढाच तुमचा फायदा होईल. माझं काय होईल याची काळजी करू नका. देवेंद्र जी, मी आहे, मुरलीधर मोहेळ आणि अमित शाहही आहेत.हे विधान बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले होते.

बावनकुळे यांच्या विधानावर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे. काँग्रेस संपवण्याची गोष्ट त्यांनी करू नये. हा लोकांचा पक्ष असून लोक विचारधारेने जमला आहे असे बोलत गायकवाड यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे.

नक्की काय म्हणाले बावनकुळे?
आपला पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्व पक्ष पक्षप्रवेश करुन घेतात. विरोधकांमध्ये स्वत:चा पक्ष वाढवण्याची आता क्षमता राहिली नाही. काँग्रेसमध्ये काहीही नाही. शरद पवारांकडे कोणीही जात नाहीये. उद्धव ठाकरेंचे शिवबंधनही कोणी बांधून घेत नाहीये. अशी विधाने देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहेत.

PREV

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!