विधानसभा निवडणुकीचा भाजपाने ठरवला रोडमॅप, पुण्यातील बैठकीत ठरणार रणनीती

भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एक चिंतन बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या बैठकीचे नियोजन केले आहे. 

सर्वच पक्षांनी आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला गृहमंत्री अमित शाह हे पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक घेणार आहेत. पुणे येथील बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीच्या नियोजनाचे सर्व काम केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले आहे. येथे पदाधिकारी आणि नेते कार्यक्रमासाठी हजर राहणार असून त्यांच्या राहण्याची आसपास सोय केली जाणार आहे. 

महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी राहणार हजर - 
महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी हजर राहणार असून नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी ५ हजार ३०० पदाधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भाजपच्या प्रदेश कार्यकारणीचे अधिवेशन होणार असून यावेळी राज्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

नितीन गडकरींच्या हस्ते होणार उदघाटन - 
नितीन गडकरींच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून यावेळी पियुष गोयल, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. भाजपाकडून या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा लढणवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विरोधकांनी भाजपच्या बाबत खोटा नॅरेटिव्ह कसा तयार केला आणि त्यावर काय काम करता येईल यावरही यावेळी या मुद्यांवर विचार मंथन केले जाणार आहे. विधानसभेसाठी यावेळी कार्यक्रम ठरवलं जाणार आहे. अमित शहा हे सेनापती बापट रोडवरील एका हॉटेलमध्ये वास्तवास असून यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल केला जाणार आहे. 
आणखी वाचा - 
 राज्यात महाविकास आघाडीच जिंकणार, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी BJP कडून खास रणनिती तयार

Share this article