विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी BJP कडून खास रणनिती तयार

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपाकडून खास रणनिती तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात राज्यात भाजपाकडून दोन दिवसीय कोर कमेटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महायुतीच्या रुपात लढणार आहे. खरंतर, भाजपाने महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत टक्कर देण्यासाठी खास तयारी केली आहे. पण सीट शेअरिंगचा मुद्दा महायुतीमध्ये निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभेसाठी सीट शेअरिंगसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह युतीमधील तिन्ही पक्षाच्यामध्ये अधिकाधिक सीटसाठी मागणी केली जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून असे बोलले जात आहे की, लोकसभेत उत्तम कामगिरी केल्याने आपण महत्वपूर्ण सीटची मागणी करू शकतो. याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील काही सीट मिळू शकतात.

शिवसेनेकडून 100 पेक्षा आधिक जागांच्या मागणीची शक्यता
शिवसेनेकडून भाजपाकडून 100 पेक्षा अधिक जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 90 तर भाजपा 150 हून अधिक जागांची मागणी केली जाऊ शकते. भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने म्हटले की, तिन्ही दलाच्या युतीला सांभाळणे सोपे नाही. सीट शेअरिंगला औपचारिक रुप देण्यासाठी काही समस्या होऊ शकतात. दरम्यान, राजकीय रुपात महायुतीला महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्रित राहणे फार महत्वाचे आहे.

भाजपाकडून 150 हून अधिक जागा लढण्याची शक्यता
भाजपाकडून राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी 150 हून अधिक जागा लढण्याची शक्यता आहे. भाजपा 155 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याचेही चित्र दिसून येत आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या गटाला 128 ते 133 जागा येण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा घटकपक्षांसाठी सोडाव्या लागू शकतात.

मुख्यमंत्री पदासंदर्भात भाजपाचा मास्टर प्लॅन
भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करत सामूहिकरित्या लढण्याचा विचार केला आहे.याशिवाय ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे अथवा अन्य पक्षांसोबत मिळून युती करत सत्ता स्थापन केले आहे तेथे निवडणुकीआधी मुख्यपंत्री पदाचा चेहरा जाहीर न करण्याचा मास्टर प्लॅन भाजपाकडून तयार करण्यात आला आहे.

भाजपाचे महासंमेलन
पुणे येथे भाजपाकडून 22 जुलैला महासंमेलन होणार आहे. यासाठीच केंद्रीय नेते अमित शाह शनिवारी पुण्यात आले आहेत. भाजपाकडून पुण्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती ठरवली जाऊ शकते. रविवारी (21 जुलै) पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाला अमित शाह उपस्थितीत राहणार आहेत.

आणखी वाचा : 

41 दिवसांनी आचारसंहिता लागू होणार, उद्धव ठाकरेंनी भगवा सप्ताहाची केली घोषणा

पूजा खेडकरच्या आईसंबंधित दोन कंपन्यांना टाळे, प्रॉपर्टी टॅक्स न दिल्याने कारवाई

Share this article