भिगवण अपहरण प्रकरणात 'हायव्होल्टेज' ट्विस्ट! "माझं अपहरण झालेलं नाही, आमचे प्रेमसंबंध...", तरुणीच्या व्हिडिओने खळबळ

Published : Feb 18, 2026, 07:24 PM IST
bhigwan kidnapping case

सार

bhigwan kidnapping case: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. तरुणीने स्वतः व्हिडिओ जारी करून आपण स्वमर्जीने प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे. 

पुणे : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला आता पूर्णपणे वेगळे वळण मिळाले आहे. ज्या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्या प्रकरणात खुद्द त्या तरुणीनेच समोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "माझं कुणीही अपहरण केलेलं नाही, मी माझ्या मर्जीने गेले आहे," अशी स्पष्ट कबुली तरुणीने एका व्हिडिओद्वारे दिली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

दोन दिवसांपूर्वी भिगवण परिसरातून या तरुणीचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून जहीर शेख आणि अयान शेख यांनी तिचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या, पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला होता आणि आज 'भिगवण बंद'ची हाकही देण्यात आली होती.

तरुणीचा व्हिडिओ आणि खळबळजनक खुलासा

वातावरण तापलेले असतानाच संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तिने म्हटले आहे की,

प्रेमसंबंधांची कबुली: "ज्या मुलावर अपहरणाचा आरोप होत आहे, त्याच्याशी माझे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत."

अपहरणाचा दावा खोटा: "माझ्या डोळ्यात चटणी टाकून मला नेल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. मी माझ्या स्वमर्जीने घराबाहेर पडले आहे."

राजकीय आरोपांवर स्पष्टीकरण: "काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेले अपहरणाचे आरोप खोटे असून मी सुरक्षित आहे."

परिसरात तणावपूर्ण शांतता

तरुणीच्या या खुलाशानंतरही परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. हिंदू संघटनांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांची भूमिका

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जात आहे. "कोणीही सोशल मीडियावरून अफवा पसरवू नये किंवा धार्मिक तणाव निर्माण होईल असे कृत्य करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

MSRTC ST Bus: 'लालपरी'चा प्रवास आता 'हायटेक' आणि सुरक्षित! एसटी महामंडळाचा १११ कोटींचा मास्टरप्लॅन; ७ हजार कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Nagpur : नागपुरात बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; वाडी परिसरात खळबळ