बीडमध्ये हवालदाराचा धक्कादायक पराक्रम! लाच घेतल्यावरही पुन्हा वाळू माफियाला मदत, अखेर बेड्या ठोकल्या

Published : May 03, 2025, 06:54 PM ISTUpdated : May 03, 2025, 08:58 PM IST
maharashtra police

सार

लाच घेताना रंगेहाथ पकडला गेलेला एक पोलीस हवालदार निलंबनातून परतल्यानंतर पुन्हा एकदा वाळू माफियाला मदत करताना आढळून आला आहे. कॉल रेकॉर्डिंगच्या पुराव्यांवरून त्याला अटक करण्यात आली आहे.

बीड: एका पोलीस हवालदाराचा पराक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडला गेलेला हा हवालदार, निलंबन संपून पुन्हा सेवेत रुजू होताच पुन्हा एकदा वाळू माफियाला मदतीचा हात देताना आढळून आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे बीड पोलीस दलाची विश्वासार्हता पुन्हा एकदा प्रश्नाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

हवालदार रामप्रसाद कडूळेचा ‘री-एंट्री’ घोटाळा

आरोपी हवालदाराचे नाव रामप्रसाद शिवनाथ कडूळे (वय ३६) असे असून, तो सध्या पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. त्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईत, वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना पकड देण्यात आली होती. त्या प्रकरणात निलंबित झालेल्या कडूळेची सेवेत पुनर्रजूवात झाल्यानंतरची वागणूक अधिकच संशयास्पद ठरली.

वाळू माफियाला पळून जाण्यास मदत

७ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजता, नाथापूर शिवारातील सिंदफना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन उपअधीक्षक पूजा पवार यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथक पाठवून कारवाई केली. यात एक जेसीबी आणि चालक पकडण्यात आला, पण इतर चार जण फरार झाले. फरार आरोपींपैकी गोरख दिलीप काळे या वाळू माफियाचा यात समावेश होता.

मोबाईलमधून उघड झाला कट

पिंपळनेर पोलिसांनी तपास पुढे नेला असता, गोरख काळे याला पकडण्यात आले. त्याचा मोबाईल तपासताना त्यामध्ये हवालदार कडूळे आणि काळे यांच्यातील संवादाची कॉल रेकॉर्डिंग सापडली. यामधून स्पष्ट झाले की कडूळे याने काळेला पळून जाण्यासाठी मदत केली होती.

कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे अटक

या कॉल रेकॉर्डिंगचे पुरावे उपअधीक्षक पूजा पवार यांनी अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना सादर केले. वरिष्ठांच्या परवानगीनंतर शनिवारी कडूळे याला सह-आरोपी म्हणून अटक करण्यात आली. आता त्याचे पुन्हा एकदा निलंबन होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस दलाची विश्वासार्हता डागाळली

या प्रकारामुळे बीड पोलिस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा रक्षकच जर कायदा मोडत असतील, तर सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडण्याचा धोका आहे. याप्रकरणी कडूळे याच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!