बदलापूर अत्याचारप्रकरणी आतापर्यंत किती जणांना केली अटक, जाणून घ्या

Published : Aug 20, 2024, 01:08 PM IST
ujjain rape case

सार

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतप्त पालकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. यानंतर संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. तर पालकांकडूनही शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक केली. तसेच संस्था चालक, शिक्षकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या प्रकरणानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर तक्रार नोंदवण्यात आली.

मुख्य आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली. अक्षय शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. तो 24 वर्षांचा असून या शाळेतील सफाई कर्मचारी म्हणून तो काम करत होता.

मुख्याध्यापिकेसह दोन सेविका निलंबित

याप्रकरणी शाळा प्रशासनाने तीन जणांवर कारवाई केली आहे. शाळेच्या संचालक मंडळाने याप्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे. तसेच शाळेमध्ये मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या 2 सेविकांनाही कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. तसेच तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बदलापूर पूर्वेकडील पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी केल्याचा आरोप करत बदली केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण संस्थेने एक चौकशी समिती नेमली आहे.

संस्था चालक आणि शिक्षकांचीही चौकशी सुरू

बदलापूर पोलिसांकडून संस्था चालक व शिक्षकांची देखील चौकशी करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी शाळा प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासोबच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची योग्य ती दखल घेतली आहे. तसेच याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यावर तात्काळ कारवाई करुन कठोर शिक्षा करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.

आणखी वाचा :

दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराप्रकरणी बदलापूरकर संतप्त, थेट रेल्वे रुळावरच ठिय्या

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!