
Ashadhi Wari Toll Waiver : राज्य सरकारने आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १८ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत ही सवलत लागू असणार आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यांवर ही सवलत लागू केली जाणार आहे.
टोलमाफीचा शासन निर्णय
२८ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारी तयारीसंबंधी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मानाच्या पालख्या, वारकरी आणि भाविकांसाठी सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती, तसेच वाहनांना टोलमाफी देण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकृत आदेश काढून टोल सवलतीचा निर्णय जाहीर केला.
कोणत्या वाहनांना मिळणार टोलमाफी?
टोलपास आणि स्टिकर्स कुठे मिळतील?
सवलतीसाठी भाविकांना आणि वारकऱ्यांना वाहनावर पुढीलप्रमाणे माहिती असलेले स्टीकर्स लावणे आवश्यक आहे:
“आषाढी एकादशी २०२५, गाडी क्रमांक, चालकाचे नाव”
हे स्टीकर्स पुढील ठिकाणी समन्वय साधून उपलब्ध होतील:
यामध्ये आवश्यक संख्येनुसार पास देण्यात येतील आणि परतीच्या प्रवासातही हे पास वैध असतील. त्यामुळे एकाच स्टीकरचा वापर दोन्ही मार्गासाठी करता येईल.
सुरळीत वाहतुकीसाठी अतिरिक्त व्यवस्था
या निर्णयामुळे आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविक व वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, टोल माफ केल्यामुळे त्यांच्या प्रवासात आर्थिक आणि व्यवस्थात्मक सुलभता निर्माण होईल.