
Ashadhi Wari 2025 Special Train : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे वारी करणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीचा करण्यासाठी मध्य रेल्वेने 1 जुलै ते 10 जुलै 2025 दरम्यान तब्बल 80 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत:
नागपूर – मिरज: 4 विशेष सेवा
नवीन अमरावती – पंढरपूर: 4 विशेष सेवा
खामगाव – पंढरपूर: 4 विशेष सेवा
भुसावळ – पंढरपूर (अनारक्षित): 2 विशेष सेवा
लातूर – पंढरपूर (अनारक्षित): 10 विशेष सेवा
मिरज – कलबुर्गी (अनारक्षित): 20 विशेष सेवा
कोल्हापूर – कुर्डुवाडी (अनारक्षित): 20 विशेष सेवा
पुणे – मिरज (अनारक्षित): 16 विशेष सेवा
या विशेष गाड्यांमुळे वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीसाठी सुरक्षित, वेगवान आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
आरक्षणाची माहिती
16 जूनपासून या आषाढी विशेष ट्रेनचे आरक्षण सुरू होणार आहे. प्रवाशांना विशेष शुल्कासह आरक्षण करता येईल. हे आरक्षण IRCTC च्या संकेतस्थळावर तसेच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
लाखो भाविकांची उपस्थिती
आषाढी वारी ही महाराष्ट्राची अत्यंत महत्त्वाची आणि श्रद्धेची परंपरा आहे. दरवर्षी राज्यातीलच नव्हे, तर देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. यावर्षी भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन एसटी महामंडळानेही जादा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विठ्ठल भक्तांसाठी रेल्वेचा विशेष उपाय
ही 80 विशेष गाड्यांची व्यवस्था ही वारकऱ्यांच्या सोयीसाठी केलेली मोठी पावले मानली जात आहे. त्यामुळे यावर्षीची वारी अधिक सुखद आणि अडथळेविना पार पडण्याची शक्यता आहे.विठ्ठल भक्तांनी लवकरात लवकर आपले तिकीट आरक्षित करून या पवित्र वारीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.