Ashadhi Wari 2024 : विठ्ठल दर्शन रांगेतील भाविकांना 15 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Ashadhi Wari 2024 : मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्यावेळी होणारी व्हीआयपी गर्दी टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. वास्तविक मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने जास्त व्हीआयपी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरे जावे लागते. यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापुजेला मर्यादित व्हीआयपींना प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वसामान्य वारकऱ्यांना झटपट दर्शन मिळण्यासाठी प्रशासन सज्ज
आषाढी यात्राकाळात दर्शन रांगेत हजारो भाविक असताना बंद केलेले व्हीआयपी दर्शन हे बंदच राहणार असून सर्वसामान्य भाविकांना झटपट दर्शन मिळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची खंबीर भूमिका सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली. भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
दर्शन रांगेत भाविकांना शुद्ध पाणी आणि मँगो ज्यूस दिला जाणार
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो वारकरी येतात. विठ्ठल दर्शन रांगेतील भाविकांना 15 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी वारीत सहभागी होणार
काँग्रेसचे दिग्गज नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील वारीत सहभागी होण्याचे ठरवले आहे. ते रविवारी म्हणजेच येत्या 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. सध्या अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात आहे. राज्यभरातून हजारो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. या वर्षी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी वारीत सहभागी घेतला होता.
आणखी वाचा :