Ashadhi Wari 2024 : रविवारपासून विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू, दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांचे होणार दर्शन

Ashadhi Wari 2024 : पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. रविवारपासून भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे.

Rameshwar Gavhane | Published : Jul 7, 2024 8:33 AM IST / Updated: Jul 07 2024, 02:04 PM IST

Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीचा सोहळा जवळ आला आहे. आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हळुहळु वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तर काही वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. तसेच रविवारपासून भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. याबाबतची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

देवाचे राजोपचार रविवारपासून बंद

रविवारपासून सकाळी 11 वाजता महानैवेद्यानंतर देवाचा पलंग निघाला. आषाढी सोहळ्यासाठी देवाचे सर्व राजोपचार रविवारपासून बंद झाले आहेत. मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. रविवारपासून देवाला थकवा जाणवू नये म्हणून पाठीला कापसाचा लोड लावला आहे. रविवारपासून अशाधिव्यात्रा होईपर्यंत देव झोपण्यास जात नसल्याने देवाचा पलंग निघणार आहे.

एका मिनिटात 30 ते 35 भाविका विठ्ठलाचे पददर्शन घेणार

रविवारपासून एका मिनीटात 30 ते 35 भाविका विठ्ठलाचे पददर्शन घेणार. तर दिवसभरात 30 ते 35 हजार भाविकांचे पददर्शन घडवले जाते. तर एक लाखाच्या आसपास भाविकांचे दररोज मुखदर्शन होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रविवारपासून म्हणजे 7 जुलै ते 26 जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. प्रक्षाळ पुजेनंतर विठ्ठल मंदिर रात्री दर्शनासाठी बंद राहणार आहे. रविवारपासून व्हिआयपी दर्शन बंद असणार आहे. जास्तीत जास्त सर्वसामान्य वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळण्यासाठी 24 तास दर्शन सुरु केल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली.

आणखी वाचा

Ashadhi Wari 2024 : आषाढीला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी बुंदीचे 11 लाख लाडू बनवण्यास सुरूवात, गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनवणार

 

 

Read more Articles on
Share this article