मंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलानं विवाहित महिलेवर केला अत्याचार, बजावली नोटीस

Published : May 27, 2025, 01:58 PM IST
SHIRSATH COMPANY

सार

शिवसेना नेते संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने वैयक्तिक संबंध, भावनिक छळ, गर्भपात आणि धमकीचे गंभीर आरोप केले आहेत

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैयक्तिक संबंध, भावनिक छळ, गर्भपात आणि धमकी यांचा समावेश असून, यामुळे राजकीय घराण्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आणि सिद्धांत शिरसाट यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि नंतर चेंबूर येथील एका फ्लॅटवर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सिद्धांत यांनी तिला विवाहासाठी भावनिक दबाव टाकला आणि आत्महत्येची धमकी दिली, असा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर दोघांनी बौद्ध पद्धतीने विवाह केला, असा दावा महिलेने केला आहे .

महिलेच्या आरोपानुसार, विवाहानंतर सिद्धांत शिरसाट यांच्या वर्तनात बदल झाला. त्यांनी तिला चेंबूरच्या फ्लॅटमध्येच राहण्यास सांगितले आणि छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. तसेच, सिद्धांत यांचे इतर महिलांसोबतचे संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी तिला धमक्या दिल्या, असा आरोपही महिलेने केला आहे .

महिलेने ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोपही तिने केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!