
Akola Murder Case : घरगुती वादावरुन पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नी आणि सावत्र मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना अकोल्यात घडली आहे. सदर घचना तारफैल परिसरातील सिद्धार्थ नगर येथील आहे. या प्रकरणातील आरोपी सुरज गणवीरला रामदास पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नक्की काय घडले?
पत्नी अश्विनी ही सुरज यांची दुसरी पत्नी होती. अश्विनीला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून अश्विनी आणि सुरज यांच्यामध्ये वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी सूरज जेवायला बसला असता अश्विनीसोबत त्याचे वाद झाले. या दोघांमधील वाद टोकाला गेल्याने ओढणीने सुरजने आधी अश्विनी आणि नंतर सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केली.
दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपी सूरजने पोलिसांनी घटलेल्या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत प्रकरणाची अधिक माहिती घेतली. तेव्हा आरोपी सूरजने पत्नीसोबत सतत वाद व्हायचा असे पोलिसांना सांगितले. याशिवाय पहिल्या पत्नीची मुलं घरी आली असता त्यांना सावत्र वागणूक दिली जात असल्याची खंतही सूरजने पोलिसांसमोर व्यक्त केली. एवढेच नव्हे अश्विनीवर लाखभर रुपयांचे कर्ज फेडले तरीही अश्विनीसोबत वाद व्हायचे अशीही माहिती सूरजने पोलिसांना दिली.