अकोल्यात वाघाडी नदीच्या पुलावरून कार कोसळली; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Published : Jun 02, 2025, 11:40 AM IST
Dhar road accident

सार

अकोल्यात झालेल्या एका भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. याशिवाय अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Car Accident Near Akola : अकोल्यात एक धक्कादायक अपघात घडला असून यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वाडेगाव बाळापूर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. पातूर एमएच 30 एझेड 7557 क्रमांकाची चारचाकी कार वाडेगावहून बाळापूरकडे जात असताना, वाघाडी नदीवरील पुलाचे कठडे तोडून थेट पुलाखाली कोसळली. 

या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारमधील प्रवाशांपैकी कन्हैयासिंग ठाकूर (वय 54), विशाल भानुदास सोलनकर (वय 45) आणि सुनील शर्मा (वय 45) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकही जमले होते. या अपघाताने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मृत आणि जखमी व्यक्ती बाळापूर शहरातील रहिवासी असल्याचे समजते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

रत्नागिरीची वेदा ठरतेय इंटरनेट सेन्सेशन, वय 1 वर्ष 9 महिने, 100 मीटर पोहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डममध्ये विक्रमाची नोंद!
मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!