ट्रेनमध्ये चढताना प्रवासी पडला आणि जवानाने वाचवला जीव

Published : Jun 02, 2025, 09:58 AM IST
Railway security personnel saving a woman

सार

मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाचा तोल चुकून तो प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्ये पडला. गाडी सुरू होत असताना RPF जवान प्रसाद शेलार यांनी त्याला वाचवले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, शेलार यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे.

मुंबई | प्रतिनिधी रोज हजारो प्रवासी धावत्या गाड्यांमधून प्रवास करतात. काही क्षणांची चूक जीवावर बेतू शकते, पण योग्य वेळी दिलेला हात जीव वाचवू शकतो — हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मुंबईतील रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका थरारक घटनेबद्दल माहिती जाणून घ्या. मुंबईच्या एका व्यस्त रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाचा तोल चुकून तो सरळ प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्ये पडला. गाडी सुरू होत असताना त्याचा पाय घसरला आणि क्षणार्धात तो रुळांवर जाण्याच्या उंबरठ्यावर आला.

पण त्या क्षणी तिथे ड्युटीवर असलेला रेल्वे सुरक्षा बलाचा (RPF) जवान प्रसाद शेलार याने विना वेळ न गमावत त्या प्रवाशाला ओढून बाहेर काढलं. त्या एका क्षणाने एक जीव वाचला आणि एक कुटुंब एकटं पडण्यापासून वाचवलं आहे. ही घटना स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जवान प्रसाद शेलार याच्या प्रसंगावधान आणि शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत विचारले असता "ही माझी जबाबदारी आहे, मी फक्त माणूस म्हणून माझं काम केलं," असं नम्र उत्तर शेलार यांनी दिलं. त्यांच्या या भूमिकेने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं. रेल्वे प्रशासनाने जवान शेलार यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला असून, "या शौर्यामुळे अनेक प्रवाशांना सुरक्षेचा विश्वास वाटला असेल," असं मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Satbara Utara : सातबारा उताऱ्यात या नोंदी दिसल्या तर सावध! जमीन जप्तीपासून कारवाईपर्यंत मोठे परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जमीन वापर नियमांत ऐतिहासिक बदल! ‘सनद’ची अनिवार्यता रद्द; नागरिक–बिल्डर्स–जमीनधारकांना मोठा दिलासा