महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासह सहा जण देखील मृत पावले. आज शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर बारामतीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय नेतेमंडळी बारामतीत दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय पवार कुटुंबियांसह बारामतीमधील स्थानिकांकडून अजित पवारांच्या निधनामुळे मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

09:09 PM (IST) Jan 29
Electric Kettle : इलेक्ट्रिक केटल फक्त पाणी गरम करण्यासाठी नाही, तर तुम्ही याचा वापर करून अनेक झटपट आणि सोप्या रेसिपी बनवू शकता.
09:01 PM (IST) Jan 29
Swiggy New AI Feature : स्विगीने आता ChatGPT, Claude आणि Gemini द्वारे थेट जेवण आणि किराणा सामान ऑर्डर करण्याची नवीन AI सुविधा सुरू केली आहे.
08:58 PM (IST) Jan 29
Grow Ginger at Home Without Soil : तुम्हाला घरी सहज आलं लावायचं आहे का? यासाठी जास्त मेहनत करायची गरज नाही. इतकंच नाही, तर हे आलं लावण्यासाठी मातीचीही गरज नाही. नेमकं काय करायचं ते जाणून घ्या.
04:23 PM (IST) Jan 29
भारत-EU मुक्त व्यापार करारामुळे (FTA) लँड रोव्हर डिफेंडरसारख्या आयात केलेल्या गाड्यांच्या किमती लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. आयात शुल्क कमी झाल्यामुळे डिफेंडरची किंमत टोयोटा फॉर्च्युनरच्या जवळ येऊ शकते.
12:45 PM (IST) Jan 29
पार्थ आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला आलेल्या प्रत्येकाचे हात जोडून आभार मानले आहेत.
12:22 PM (IST) Jan 29
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे.
12:20 PM (IST) Jan 29
अजित पवारांसोबत विमाना अपघातात मृत्यू पावलेली क्रू मेंबर पिंकी माळीचे पार्थिव मुंबईतील राहत्या घरी आणण्यात आले आहे.
12:18 PM (IST) Jan 29
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुलगा पार्थ आणि जय यांच्याकडून अग्नि देण्यात आला.
12:15 PM (IST) Jan 29
Ajit Pawar Funeral Live: बारामतीत अजित पवारांची अंत्ययात्रा भावुक वातावरणात निघाली. हजारो समर्थकांनी 'अजित दादा अमर रहे'च्या घोषणा दिल्या. शरद पवार, अमित शहांसह अनेक दिग्गज अंत्यसंस्कारात सामील झाले. विमान अपघाताची चौकशी सुरू आहे.
12:04 PM (IST) Jan 29
अभिनेता रितेश देखमुखने अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावत त्यांना अखेरचा निरोप दिला.
11:38 AM (IST) Jan 29
11:32 AM (IST) Jan 29
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी, काल विमान अपघातात प्राण गमावलेल्या आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला.
10:46 AM (IST) Jan 29
10:44 AM (IST) Jan 29
10:08 AM (IST) Jan 29
10:06 AM (IST) Jan 29
09:53 AM (IST) Jan 29
09:51 AM (IST) Jan 29
09:24 AM (IST) Jan 29
09:21 AM (IST) Jan 29
09:14 AM (IST) Jan 29
08:36 AM (IST) Jan 29
Ajit Pawar Plane Crash : अजित पवार विमान अपघाताची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवी. कारण या देशात कोणीही सुरक्षित नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
08:34 AM (IST) Jan 29
Ajit Pawar funeral : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विमान अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता.
08:27 AM (IST) Jan 29
अंत्यसंस्कारापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडी येथील घरी आणण्यात आले.
08:24 AM (IST) Jan 29
अजित पवारांचे पार्थिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयातून बाहेर आणण्यात आले आहे. आज अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
08:22 AM (IST) Jan 29
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजेपर्यंत बारामतीमधील विद्या प्रतिष्ठात मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.