NEET आंदोलनानंतर काय घडलं? अभिजीत दीपके याच्या आई-वडिलांनी केला मोठा गौप्यस्फोट

Published : Jul 30, 2026, 09:31 AM IST
Abhijeet Dipke Mother

सार

NEET आंदोलनामुळे चर्चेत आलेला CJP चा संस्थापक अभिजीत दीपके याच्या आई-वडिलांनी मोठा दावा केला आहे.

मुंबई : नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहाराविरोधात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचा मुख्य चेहरा आणि सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके सातत्याने चर्चेत आहे. आता आंदोलनानंतर पुन्हा एकदा अभिजीत दीपके चर्चेत आला आहे. दीड महिन्यांच्या आंदोलनानंतर आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी परतला आहे. यावेळी त्याच्या आई-वडिलांनी केलेल्या दाव्यांमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

धमकीनंतर काही दिवस घर सोडावं लागलं

अभिजीत दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आंदोलन सुरू झाल्यानंतर मुलाला एका धमकीच्या व्हिडिओचा सामना करावा लागला. त्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर एका विशिष्ट राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा दबाव टाकण्यात आला होता. असे न केल्यास कुटुंबीयांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा देण्यात आल्याचा दावा अनिता दीपके यांनी केला आहे. या घटनेनंतर कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही दिवस घरापासून दूर राहण्याचा निर्णय देखील घेतल्याचे अभिजीतची आई म्हणाली. 

16 दिवस नातेवाईकांकडे राहिलो

अनिता दीपके यांनी सांगितले की, मुलाने सुरुवातीला ही बाब कुटुंबापासून लपवून ठेवली होती. मात्र नंतर संपूर्ण प्रकार सांगत काही दिवस घरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी आणि पती भगवान दीपके कोकणातील नातेवाईकांकडे जवळजवळ 16 दिवस राहिले. भगवान दीपके यांना कमी रक्तदाबाचा त्रास असल्याने अभिजीतला त्यांच्या प्रकृतीचीही चिंता होती, असे त्यांनी म्हटले.

टीका ही सार्वजनिक जीवनाचा भाग

या प्रकरणावर अभिजीत दीपके यांचे वडील भगवान दीपके यांनीही प्रतिक्रिया दिली. सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींवर टीका होणे स्वाभाविक असते. काहीजण कामाचे कौतुक करतात, तर काही टीका करतात. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून मत व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक