12 लाख विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अवैध, विद्यार्थी राहणार गणवेशापासून वंचित?

Published : Apr 02, 2024, 01:45 PM IST
aadhar card

सार

आधार कार्डच्या बाबतीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील सुमारे बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अवैध असल्याचे सांगण्यात आले आहे.

आधार कार्डच्या बाबतीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील सुमारे बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अवैध असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकार आधार कार्ड असलेल्या नवीन गणवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून गणवेश दिला जाणार आहे. हे गणवेश आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांना ड्रेस दिले जाणार आहेत, त्यामुळे हे विद्यार्थी वंचित राहतात का याकडे लक्ष दिले जाणार आहे. 

शिक्षण आयुक्त काय म्हटले? 
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक अवैध आधार कार्डची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर, अहमदनगरसह बारा जिल्ह्यांनी वेळेत पडताळणी पूर्ण केली आहे. याबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना गणवेश मिळणार नाहीत. विभागाने ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांना अवैध आधार क्रमांकाशी जोडलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल. 

95% विद्यार्थ्यांकडे वैध आधार कार्ड असून उर्वरित 5 टक्के विद्यार्थ्यांना आधार कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत. यावेळी बोलताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना सुविधा मिळण्यात अडचण निर्माण होत असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता आधार कार्डचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा लागणार आहे. 
आणखी वाचा - 
पतंजलीला जाहिरातीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिली चेतावणी, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण होते हजर
तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आजही आहेत? RBI च्या या 19 कार्यालयांमध्ये आजपासून करू शकता डिपॉझिट

PREV

Recommended Stories

Nagpur Smart City Case : स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढेंना क्लीन चिट; ईओडब्ल्यू व पोलिसांचा अहवाल विधानसभेत सादर
BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात