राज्यभरात धो धो पाऊस कोसळणार; काही ठिकाणी येलो अलर्ट जारी, विदर्भ आणि कोकणात वादळी पावसाची शक्यता

Published : Jun 29, 2026, 08:46 AM IST
IMD Monsoon Rain Alert

सार

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असून, नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.

काळ रात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. केरळमध्ये २ जूनला पाऊस दाखल झाला. शेतकऱ्याला कधी पाऊस पडतोय असं वाटत आहे. आज वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात समाधानकारक पाऊस पडत नसल्याची भावना यावेळी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईत चांगला पाऊस झाला.

नवी मुंबईत जोरदार पाऊस 

सकाळी नवी मुंबईत अर्धा पाऊस सुरु झाला आहे. नवी मुंबई येथील जुईनगर, वाशी आणि पनवेलमध्ये जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत नालेसफाई न झाल्यामुळं सगळीकडं पाणी साचलं आहे. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळं येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढला 

महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. २८ जून ते ४ जुलै या दरम्यान कोकण आणि गोवा येथे बऱ्यापैकी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम भारतात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरु होऊ शकतो. असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

ईडीची चौकशी होईल म्हणून केलं पक्षांतर, संजय राऊत यांनी ओमराजेंवर केला आरोप
ओमराजे निंबाळकरांच्या डोळ्यात आलं पाणी, ठाकरेंबद्दल अजूनही मनात आदर