ईडीची चौकशी होईल म्हणून केलं पक्षांतर, संजय राऊत यांनी ओमराजेंवर केला आरोप

Published : Jun 28, 2026, 07:09 PM IST
Sanjay Raut Press Conference

सार

धाराशिवमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ईडीच्या चौकशीला घाबरून ओमराजे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप राऊत यांनी केला. आम्ही १५-२० वर्षे एका सापाला दूध पाजलं, आता त्याचा फणा ठेचायची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी निंबाळकरांवर निशाणा साधला.

धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्यावेळी सेनेचे नेते संजय राऊत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. धाराशिवमध्ये ऑपरेशन तुडवा सुरु झालं असून ते यशस्वी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कमी शब्दांमध्ये बोलून ओमराजे यांचा राऊत यांनी समाचार घेतला.

चौकशी लागल्यामुळं शिंदे गटात केला प्रवेश 

ईडीची चौकशी लागल्यामुळं ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. त्यांच्या वडिलांचा खून झाला, त्यामागं काहीतरी कट असल्याची माझी खात्री पटल्याचं यावेळी राऊत यांनी सांगितलं. पवनराजे मल्टीस्टेट यांनी धाराशिव शहरात ५०० फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप ओमराजे यांच्यावर केला.

सापाचा फणा ठेचायची वेळ आली 

आम्ही १५ ते २० वर्ष एका सापाला दूध पाजलं. आता त्या सापाचा फणा ठेचायची वेळ आल्याचं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हा डरपोक सोंगाड्या आपली चौकशी होईल म्हणून पक्ष सोडून गेल्याचा आरोप केला. तेरणातील भंगार विकून पैसा खाल्याचा आरोप यावेळी ओमराजे निंबाळकर यांच्यावर करण्यात आला आहे. आता ओमराजे याला काय उत्तर देतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान या 6 जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता
Maharashtra Voter List 2026 : महाराष्ट्राच्या मतदार यादीत मोठा बदल; 2 कोटींहून अधिक नावे वगळली