
Chhatrapati Sambhajinagar Accident: आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. आपण जगत आहोत हाच क्षण शेवटचा हे म्हणूनच जगायला हवं. वर्षभरापूर्वी जीवनदान दिलेल्या मुलीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मैत्रिणीसह ट्रिपल सीट रॉंग साईड जाणाऱ्या स्कुटीला अज्ञात ट्रकने दिलेल्या धडक दिलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर यामधील दोन मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
सोमवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. एका मुलीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःख कोसळलं आहे. विशाखा विश्वास वंजारे (वय 20 रा. बीड) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सानवी शिंगारे राहणार बीड, अपेक्षा जमधडे राहणार गडचिरोली असे गंभीर जखमी झालेल्या तरुणींचे नाव आहे. या दोन्ही तरुणींवर खाजगीर कुणालाच उपचार सुरू आहेत.
शेंद्रातील पीपल्स फॉरेन सिक्स सायन्स महाविद्यालयात या ठिकाणी ३ मुली शिक्षण घेत होत्या. त्यांनी कॉलेज जवळच राहण्यासाठी एक खोली घेतली होती. मित्रांसोबत चहा प्यायला जायचं म्हणून तिघी रात्री स्कुटीवर निघाल्या पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होत. त्या तिघी चुकीच्या मार्गाने रस्त्यावरून जात होत्या.
जाताना एका स्कुटीने त्यांना टक्कर दिली आणि नंतर पुढून येणाऱ्या गाडीने तिघींच्या गाडीला टक्कर मारली. टक्कर मारल्यानंतर तिघी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आणि नंतर एकीचा मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या दोघींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
बीड येथील विशाखा वंजारे हिच लिव्हर निकामी झाल्याने गेल्यावर्षी वडिलांनी तिला लिव्हर दिले होते. यामुळे तिला जीवदान मिळालं होतं. विशाखाची प्रकृती स्थिर झाल्याने पालकांनी दिला पुढील शिक्षणासाठी विशाखा छत्रपती संभाजी नगर मध्ये आली. ती सध्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असून आता घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.