ठाकरेंचा फुटलेला खासदाराचा व्हिडीओ व्हायरल, संजय राऊत यांच्याबद्दल काय म्हणाला?

Published : Jun 21, 2026, 06:50 PM IST
nagesh patil

सार

ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश करत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी, सत्तेत असल्याशिवाय काम होत नसल्याने आणि वर्धापन दिनी झालेल्या टीकेमुळे मन दुखावल्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. आपण एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत गेलो असून विचारधारा सोडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यांनी आता शिंदे गटात गेल्याच जाहीर केलं असून नागेश पाटील आष्टीकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत गेल्याच म्हटलं आहे. यावेळी सत्तेत असल्याशिवाय काम होत नाही असं स्पष्ट मतच नागेश पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

आमच्यावर बोचऱ्या शब्दात केली टीका 

आम्ही १८ जूनपर्यंत कुठंही गेलो नव्हतो. मात्र शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी बोचऱ्या शब्दात टीका करण्यात आली. त्यामुळं आमचं मन खऱ्या अर्थाने दुखावलं गेलं. आपण अनेक दिवसांपासून पाहतोय की सत्तेशिवाय काम होत नाही. अनेकांना माझी भूमिका पटली नसेल तर काहींना ती पटली असेल. माझ्यावर तुम्ही जी जबाबदारी सोपवलीय ती मात्र मी मनापासून पार पाडीन.

मी एका सेनेतून दुसऱ्या सेनेत गेलोय 

मी एका सेनेतून दुसऱ्या सेनेत गेलोय असं यावेळी बोलताना नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलं आहे. मी विचारधारा सोडलेली नाही असं यावेळी बोलताना नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलं आहे. शब्द मनाला खूप लागतात, त्यामुळं बोलताना विचार करा असं नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

संजय राऊतांना काय म्हणाले?

 संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना नागेश पाटील यांनी म्हटलं की, झोडून काढ, हरकत नाही ते माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी बोलायला हरकत नाही. मात्र झोडून काढू म्हणजे कोणाला कमी लेखायचं नसत, त्याचे परिणाम वाईट होतात असं यावेळी बोलताना नागेश पाटील यांनी म्हटलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक