गिरीश महाजन यांच्या व्हायरल फोटोबाबत सायबर सेलनं दिलं स्पष्टीकरण, काय माहिती आली समोर

Published : Jun 21, 2026, 02:11 PM IST
girish mahajan

सार

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आक्षेपार्ह फोटो बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने या छायाचित्रांचे परीक्षण करून ते मॉर्फ करण्यात आल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते. ते फोटो खरे नसून त्यामध्ये फेरफार करण्यात आल्याचं अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने या छायाचित्रांचे परीक्षण केलं. त्यानंतर ते बनावट असल्याचं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं.

गिरीश महाजन यांचे फोटो केलं मॉर्फ 

गिरीश महाजन यांचे फोटो मॉर्फ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यांचे एका तरुणीसोबतचे फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली. त्यानंतर गिरीश महाजन यांचे ओएसडी अमोल पाटील यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर पटपट तपास चक्रे फिरवण्यात आली. याप्रकरणी BNS, IT ॲक्ट आणि महिलांचे अश्लील चित्रण प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या छायाचित्रणांचा तांत्रिक विश्लेषण पूर्ण करण्यात आले आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सायबर पोलिसांकडून याबाबतच प्रमाणपत्र जारी करण्यात आलं.

गिरीश महाजन यांनी केली होती सखोल चौकशीची मागणी 

यावेळी गिरीश महाजन यांनी सखोल चौकशीची मागणी केली होती. मला माहित नाही हे फोटो कसे मॉर्फ करण्यात आले पण मी याबाबत लवकरच खुलासा करणार आहे. फोटो मॉर्फिंग करून ते दाखवले जात आहेत. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याचं महाजन यांनी यावेळी म्हटलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक