ओमराजे यांचा हिशेब चुकता करणार, शिवसैनिकांचा संताप

Published : Jun 19, 2026, 07:32 PM IST
shivsainik

सार

शिवसेना पक्षातील ६ खासदार फुटणार असल्याच्या चर्चेने जोर धरला असून, यात ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा जणांची नावे आहेत. पक्षाच्या वर्धापन दिनी जमलेल्या संतप्त शिवसैनिकांनी या खासदारांना 'गद्दार' संबोधून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि भविष्यात त्यांचा हिशोब चुकता करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शिवसेना पक्षातील ६ खासदार फुटणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. ठाकरेंनी ६०व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत ठेवलेल्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

ओमराजे यांचा हिशोब चुकता करणार 

ओमराजे निंबाळकर यांचा हिशोब चुकता करणार असल्याची भावना यावेळी सांगलीवरून आलेल्या तालुकाप्रमुखानं व्यक्त केली. २०२९ला हे खासदार साधे ग्रामपंचायत लढायचे लायकीचे राहणार नाहीत, त्यांच्या विरोधात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे. ओमराजे यांचा प्रचार करायला सांगलीवरून धाराशिवला गेलो होतो. आता त्यांचा हिशोब चुकता करणार असं एका कार्यकर्त्याने म्हटलं आहे.

ठाकरे कुटुंब म्हणजे नेते तयार करण्याची फॅक्टरी 

ठाकरे कुटुंब हे नेते तयार करायची फॅक्टरी असल्याचं यावेळी कार्यकर्त्यानी म्हटलं आहे. शिवसेनेवर संकट आली तरी घाबरत नाही. काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला खासदार केलं, मुलीला नगरसेवक केलं. आम्ही राजीनामा मागतोय.

गद्दारांचा राजीनामा मागतोय 

आम्ही या गद्दारांचा राजीनामा मागतोय असं यावेळी शिवसैनिकांनी म्हटलं आहे. ठाकरे कधी संपत नसतात. ठाकरे हि नेते तयार करण्याची कंपनी असल्याचं मत यावेळी इथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. आज उद्धव ठाकरे काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक