गुटखा मिळत नसल्यानं कॅबचालक संतप्त, तुकाराम मुंडे यांना केली शिवीगाळ

Published : Jun 24, 2026, 09:16 PM IST
tukaram munde

सार

अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळ आणि विनापरवाना व्यवसायांवर कारवाई सुरू केली आहे. त्यांनी राज्यात गुटखा बंदी लागू केल्याने कल्याणमध्ये एका कॅब चालकाने त्यांना शिवीगाळ केली, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अन्न आणि औषध विभागाचा तुकाराम मुंडे यांनी पदभार घेतल्यापासून त्यांनी कामाला झपाटून सुरुवात केली आहे. कायम दसरा किंवा दिवाळी मोसमाच्या वेळेला काम करणारा हा विभाग आता ऍक्टिव्ह झाला असल्याचं दिसून आलं आहे. त्यांच्या विभागानं आता भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.

विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई 

विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करायला मुंडे यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळं नागरिकांमधून त्यांचं मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे. राज्यात मुंडे यांनी गुटखा बंद केला असून तो विकणाऱ्याच्या विरोधात मोक्का लावण्याचं जाहीर केलं. त्यांनी दिलेल्या आदेशामुळं गुटखा बंद करण्यात आला आहे.

विकृत लोकांकडून राग व्यक्त 

विकृत लोकांकडून मात्र मुंडे यांच्या विरोधात राग व्यक्त करण्यात येत आहे. कल्याणमध्ये आता कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नसल्याचं दिसून आलं. त्यामुळं टेन्शनमध्ये आलेल्या कॅब चालवणाऱ्या ड्रायव्हरने तुकाराम मुंडे यांच्या विरोधात शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांनी दुर्गाप्रसाद पांडे या कॅबचालकाला ताब्यात घेतलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल