पुण्याचा वडगाव उड्डाण बनला मृत्यूचा सापळा, अवघ्या 24 तासांत तिघांचा मृत्यू

Published : May 04, 2025, 11:43 AM ISTUpdated : May 04, 2025, 12:07 PM IST
Dhar road accident

सार

Maharashtra Accident : वडगाव उड्डाणपूलाजवळील परिसरात 24 तासात तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. भरधाव वेगाने आलेल्या मोटारीच्या धडकेमध्ये दुचाकीवरुन येणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.

Maharashtra Accident : मुंबई-बंगळुरू मार्गावरुन बाहेरच्या दिशेला जाणारा रस्ता आणि वडगाव उड्डाणपूलाजवळील परिसरात 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी एका दुचाकीस्वार तरुणाला मोटारने उडवले, यानंतर दुपारच्या सुमारास दुकाचीस्वाराचा मृत्यू झाला. याआधीच्या दिवशी सकाळी झालेल्या अपघातात आणखी एका दुकाचीस्वाराचा मृत्यू झाला होता.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्यावेळेस मुंबई-बंगळुरू बाह्यवळ मार्गावर वेगाने आलेल्या ट्रकची दोन दुचाकी, मोटार गाडी आणि रिक्षाला धडक बसली. यामध्ये दुकाचीस्वार राहुल खाटपे याचा मृत्यू झाला. तर दयावर हुसेन सरवर या दुचाकीस्वार जखमी झाला. या घटनेत ट्रकचालकाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याशिवाय 2 मे रोजी वडगाव उड्डाणपूलावजळ सकाळी ट्रकच्या धडकेमध्ये दुकाचीस्वाराचा मृत्यू झाला किरण पावनोजी गावडे-पाटील असे त्याचे नाव होते. या प्रकरणातही ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PREV

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!