10 महिन्यांच्या मुलाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू; आईच्या डोळ्यांसमोर घडला हृदयद्रावक प्रकार

Published : Jun 06, 2025, 10:00 AM ISTUpdated : Jun 06, 2025, 10:34 AM IST
Death

सार

नाशिकमध्ये देवाळी गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाचा पाण्याचा बादलीत पाय पडून मृत्यू झाला. यामुळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील देवळाली गावाजवळील रोकडोबावाडी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. संतोष तायडे या हमाल काम करणाऱ्या मजुराच्या कुटुंबातील १० महिन्यांचा गोंडस रोशन खेळता खेळता पाण्याच्या बादलीत पडून मृत्युमुखी पडला. बुधवारी (ता. ४ जून) रात्री ही दुर्घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संतोष तायडे हे पत्नी अनिता, दोन मुले आणि वृद्ध वडिलांसह रोकडोबावाडीत एका लहानशा घरात राहतात. दररोजप्रमाणे त्या रात्रीही कुटुंबीय घरी होते. मोठा मुलगा रोहन मोबाईलवर गेम खेळत होता आणि छोटा रोशन घरातच खेळत होता. खेळता खेळता रोशन मोरीकडे गेला आणि तिथे ठेवलेल्या पाण्याच्या बादलीत डोकावत असताना अचानक तोल जाऊन पडला.

त्या वेळी अनिता स्वयंपाक करत होत्या. काही घरगुती वस्तूंसाठी त्या सासऱ्यांकडून पैसे घेऊन चप्पल घालायला मोरीजवळ आल्या, तेव्हा त्यांनी रोशनला बादलीत पालथा पडलेला पाहिलं. क्षणभर त्यांना काय झालं तेच कळेना. त्यांच्या तोंडून जोरदार टाहो फुटला. घरातले सगळेजण धावत आले. बाळाला तातडीने बादलीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

ही दुर्घटना इतकी आकस्मिक होती की कोणालाही काही समजायच्या आत एका आईच्या मांडीतील चिमुकला देवाघरी गेला. पोलिसांनी सांगितले की, रोशन खेळताना मोरीजवळ गेला आणि तेथे असलेल्या पाण्याच्या बादलीत डोकावताना पाय घसरून तो पाण्यात पडला.

या घटनेमुळे तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाळाच्या पश्चात आई-वडील, आजोबा आणि मोठा भाऊ असा परिवार उरला आहे. रोकडोबावाडी आणि देवळाली परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून, समाजमाध्यमांवरही या हृदयद्रावक घटनेबद्दल सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!