पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणी 21 व्या मजल्यावर गेली अन् मारली उडी, सुसाईड नोटमध्ये कारण उघड, अखेरचा VIDEO आला समोर

Published : Jun 06, 2025, 09:37 AM ISTUpdated : Jun 06, 2025, 09:42 AM IST
pune crime

सार

द क्राऊन ग्रीन या नामांकित निवासी सोसायटीमधील १३व्या मजल्यावरून एका २६ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केली. अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे असे या तरुणीचे नाव होते.

पुणे - पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात ३१ मेच्या पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. द क्राऊन ग्रीन या नामांकित निवासी सोसायटीमधील 21 व्या मजल्यावरून एका २६ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केली. अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे असे या तरुणीचे नाव होते.

घटनेमुळे संपूर्ण आयटी वसाहतीत खळबळ उडाली असून, पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार अभिलाषा हिने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, “सॉरी, मला माफ करा. मी हे स्वेच्छेने करत आहे. माझी आता जगायची इच्छा संपली आहे.”

पोलिसांचा तपास सुरु

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ मे रोजी पहाटे ४.३० ते ४.४५ दरम्यान घडली. अभिलाषा स्कूटीवरून सोसायटीत आली आणि थेट लिफ्टने 21व्या मजल्यावर गेली. लिफ्टमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये ती अत्यंत शांतपणे उभी असल्याचे दिसते. तिच्या हातात एक स्कार्फ होता, जो तपासात महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. काही क्षणातच ती लिफ्टमधून बाहेर पडते आणि नंतर काही मिनिटांत आत्महत्या करते.

सुसाईड नोट मागे सोडली

तिच्या खोलीची तपासणी करताना पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. त्यात तिने आपल्या आई-वडिलांची, तसेच मैत्रिणींची माफी मागितली होती. “आता जगण्यात काहीच उरलेलं नाही. आयुष्य संपवण्याचा निर्णय पूर्णपणे माझा आहे,” अशा आशयाचे तीने तिच्या शेवटच्या पत्रात लिहिले आहे.

तिच्या वस्तू पोलिसांनी घेतल्या ताब्यात

तपासादरम्यान पोलिसांनी अभिलाषाच्या खोलीतून काही वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये रक्ताचे डाग असलेले नॅपकिन्स, इनर, उशीचे कव्हर आणि तिचा मोबाइल फोन यांचा समावेश आहे. आत्महत्येपूर्वी तिच्या शरीरात काही वैद्यकीय समस्या उद्भवल्या होत्या का, याची शक्यताही पोलिस तपासत आहेत. शवविच्छेदन अहवालानुसार, तीने जी उडी घेतली त्यामध्ये तिच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाली होती.

तिच्या मैत्रिणींचे नोंदवले जबाब

अभिलाषा हिच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, ती रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती. सकाळी पाच वाजता उठल्यानंतर ती रूममध्ये नव्हती. बाथरूमच्या भिंतीवर रक्ताचे पुसट डाग होते, मात्र त्याचे महत्त्व त्यावेळी समजले नाही. तिचा फोन सकाळी बंद होता. नंतर पोलिसांकडूनच मैत्रिणीस ही दुर्दैवी बातमी समजली.

इतर शक्यता पोलिसांनी फेटाळली

हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आतापर्यंतच्या तपासात कुठलाही घातपात किंवा संशयास्पद बाबी सापडलेल्या नाहीत. त्यामुळे ही आत्महत्या नैराश्यामुळेच झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

 

मानसिक आजाराने ग्रस्त

अशा घटना केवळ आकस्मिक नसतात. त्या तरुण पिढीच्या मानसिक स्वास्थ्याविषयीचे गंभीर प्रश्न उपस्थित करतात. अभिलाषा ही एक आयटी इंजिनिअर असून ती एकीकडे यशाच्या वाटेवर होती, पण तरीही अंतर्मनात चालणाऱ्या संघर्षाने तिच्यावर एवढा परिणाम केला की तिने आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडला.

शेवटी, ‘माफ करा, मी हे स्वेच्छेने करत आहे’, हा निरोप समाजासाठी एक कठोर आरसा ठरतो आहे.

मानसिक आरोग्याबाबत तुम्हाला अथवा आपल्या परिचितांना मदतीची गरज असल्यास कृपया खालील मदत संस्थांशी संपर्क साधा:

iCall – 9152987821

AASRA – 91-9820466726

Snehi – 91-9582208181

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!