वर्ष 2024 संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच यंदाच्या वर्षात भारतातील अशी दोन मंदिरे जी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
Year Ender 2024 : वर्ष 2024 मधील अखेरचा महिना सुरू आहे. लवकरच नवं वर्ष 2025 चे स्वागत केले जाणार आहे. प्रत्येक नव्या वर्षात नव्या अपेक्षा-आशा घेऊन आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा संकल्प करतो. पण नव्या वर्षाच्या आधीच्या वर्षानेही खूप आठवणी दिलेल्या असतात त्या नेहमीच लक्षात राहण्यासारख्या ठरतात. अशातच यंदाच्या वर्षात भारतातील दोन अशी मंदिरे आहेत जी सर्वाधिक चर्चेत राहिली. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया....
22 जानेवारी 2024 हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक दिवस होता. हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या मनात सुर्वण अक्षरांमध्ये कोरला गेला आहे. कारण 22 जानेवारीला राम जन्मभूमी अयोध्यामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा पार पडला गेला. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करणे मोठे आव्हानात्मक होते. बाबरी मस्जिदचा वाद, न्यायालयात प्रदीर्घ सुरू असणारी लढाई आणि अखेर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर रामलल्लांचे मंदिर उभारण्याचा निर्णय दिला गेला होता.
रामलल्लांची नवी मुर्ती
राम मंदिरात प्रभू श्री राम यांच्या गाभाऱ्यात जुन्या मुर्तीसह नवी मुर्तीही स्थापन करण्यात आली आहे. श्याम शिळेपासून मुर्ती कोरण्यात आली आहे. या मुर्तीमध्ये रामलल्लांचे बालस्वरुप, राजकुमाराचे रुप आणि देवाचे रुपही दिसून येत आहे. कमल दलावर उभ्या असणाऱ्या मुर्तीच्या हातात तीर आणि धनुष्य आहे. मुर्तीचे वजन जवळजवळ 200 किलोग्रॅम असून उंची 4.24 फूट आणि रुंदी 3 फूट आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या इतिहासाचे जतन होण्यासाठी मंदिराच्या गर्भगृहाच्या 200 फूट खाली टाइम कॅप्सूल लावण्यात आली आहे. जेणेकरुन मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती जतन केली जाईल. याचा फायदा भविष्यात श्री राम जन्मभूमी आणि मंदिराच्या इतिहासासाठी होणार आहे.
राम मंदिरानंतर सर्वाधिक यंदाच्या वर्षात चर्चेत राहिलेले मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर. जगातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक ओळख असणाऱ्या बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांची चरबी आणि माशांचे तेल मिक्स करत असल्याचे दावे करण्यात आले. खरंतर, तिरुपती बालाजी मंदिरात तयार केल्या जाणऱ्या प्रसादाला फार महत्व आहे. मंदिरातून दररोज लाखो संख्येने प्रसादासाठी लाडू तयार केले जातात. बालाजीची कृपा असल्याच्या दृष्टीकोनातून मंदिरातील लाडूचा प्रसाद पाहिला जातो. अशी मान्यता आहे की, या लाडूचा प्रसाद न मिळाल्यास तुमचे बालाजीचे दर्शन अपुर्ण राहिल्यासारखे आहे.
आणखी वाचा :
Year Ender 2024 : झिका व्हायरस ते मंकीपॉक्स, यंदा या 5 आजारांनी केला कहर