MWC 2024 आधी Xiaomi ने लाँच केले हे धमाकेदार प्रोडक्ट्स, जाणून घ्या किंमतीसह फीचर्स
जगातील तिसरी मोठी मोबाइल फॅक्चरिंग कंपनी शाओमीने तीन धमाकेदार प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये दोन स्मार्टफोन, एक टॅब आणि तीन स्मार्ट वॉचचा समावेश आहे.
Chanda Mandavkar | Published : Feb 26, 2024 1:11 PM IST / Updated: Feb 26 2024, 06:42 PM IST
Xiaomi New Products Launched : स्पेनमधील (Spain) बार्सोलोना येथे जगातील सर्वाधिक मोठा टेक इवेंट 26 फेब्रुवारीपासू सुरू होणार आहे. “मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2024” (Mobile World Congress 2024) असे इवेंटचे नाव आहे. या इवेंटमध्ये जगभरातील प्रसिद्ध टेक कंपन्या आपले प्रोडक्ट्स लाँच करणार आहेत. पण शाओमीने (Xiaomi) या इवेंटच्या एक दिवस आधी तीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत.
शाओमीने लाँच केले हे प्रोडक्ट्स
शाओमीने Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Ultra असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यापैकी Xiaomi 14 ची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत 999 यूरो आणि 14 Ultra ची किंमत 1499 यूरो आहे. शाओमीचे हे दोन नवे स्मार्टफोन भारतात अद्याप लाँच करण्यात आलेले नाहीत. पण लवकरत भारतात लाँच केले जाऊ शकतात. असा अंदाज लावला जातोय की, शाओमीच्या स्मार्टफोनची किंमत 75 हजार रुपयांपर्यंत असू शकते. या फोनसोबत ऑफर्सही युजर्सला मिळू शकतात. अशातच फोनची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
शाओमीने एक टॅबलेटही लाँच केला आहे. याचे नाव Xiaomi Pad6s Pro असून त्याची ग्लोबल मार्केटमध्ये किंमत 699 यूरो म्हणजेच भारतीय चलनात याची किंमत 63 हजार रुपयांच्या आसपास आहे.
शाओमीने लाँच केलेले तिसरे प्रोडक्ट म्हणजे स्मार्ट वॉच. यामध्ये तीन स्मार्ट वॉच लाँच केले आहेत. कंपनीने Xiaomi Smartband 8 Pro स्मार्ट वॉच लाँच केले असून त्याची किंमत 69 यूरो म्हणजेच भारतीय चलनात याची किंमत 6200 रुपये आहे. यामध्ये हेल्थ आणि फिटनेसचे फीचर्स दिले आहेत. याशिवाय Xiaomi Watch S3 लाँच केले असून याची किंमत 149 यूरो म्हणजेच 67 हजार रुपये आहे. तिसरे स्मार्ट वॉच Xiaomi Watch 2 असून याची किंमत 199 यूरो म्हणजेच भारतीय चलनात याची किंमत 18 हजार रुपये आहे.