World No Tobacco Day 2024 : "मुलांना तंबाखू उद्योगापासून लांब ठेवणे" यंदाचे डब्लूएचओचे जागतिक तंबाखू विरोधी दिनीचे उद्दिष्ट

दरवर्षी 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी 1987मध्ये हा दिवस पाळण्यास सुरुवात केली. तंबाखूचे दुष्परिणाम, त्यामुळे होऊ शकणारे रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे.

Ankita Kothare | Published : May 30, 2024 4:35 PM IST

तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी घातक आहे. सेवन केल्यास काय परिणाम होतात या जनजागृतीसाठी दार वर्षी तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. तंबाखू किंवा धूम्रपानामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होतात हे माहित असताना देखील अनेक जण त्याचे सेवन करता. तंबाखूच्या सेवनाने मानसिक आरोग्यावर तसेच शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. लोकांमध्ये बिडी, सिगारेट, गुटखा इत्यादींच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका वाढतो.यासाठी या दिवसाचे महत्व अनन्य साधारण आहे.

तंबाखूच्या सेवनाने जगभरात दरवर्षी 80 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.यामध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर,तोंडाचा कॅन्सर यांसारखे गंभीर आजार देखील आहेत. तंबाखूचे सेवन असेच वेगाने सुरू राहिल्यास, 2030 पर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारत हा जगातील तंबाखूचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा इतिहास काय ?

तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये तंबाखू निषेध दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. पुढच्या वर्षी म्हणजे 1988 मध्ये पहिल्यांदा जागतिक तंबाखू विरोधी दिन एप्रिल महिन्यात साजरा केला गेला. मात्र,काही काळाने तो साजरा करण्यासाठी मे महिन्यात तारीख निश्चित करण्यात आली.आणि 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

तंबाखू निषेध दिवस कधी साजरा केला जातो?

दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. 1988 मध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून तंबाखूचे सेवन थांबवण्यासाठी आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देण्यासाठी साजरा करण्यात आला.

जागतिक तंबाखू विरोधी दिन 2024 ची थीम :

जागतिक तंबाखू विरोधी दिन 2024 ची थीम 'मुलांना तंबाखू उद्योगापासून लांब ठेवणे'हा आहे. (Protecting Children from Tobacco Industry Interference) तंबाखू उद्योग जगतात काम करणाऱ्या लोकांनी लहान मुलांना आणि तरुणांना लक्ष्य करुन उत्पादनांची निर्मिती करु नये, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुलांना तंबाखू उद्योगात आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या निमित्ताने करण्यात येणार आहे.

आणखी वाचा :

Vastu Tips: या दिशेला डस्टबिन ठेवताय ? एक चूक तुम्हाला करू शकते कंगाल

Oats Side Effects : करू तुम्हीही रोज नाश्त्यात ओट्स खाता का? जाणून घ्या त्याचे तोटे

Share this article