Deadliest Snake : जगात हजारो प्रजातिचे साप आढळून येतात. यापैकी काही साप एवढे विषारी असतात की, त्यांनी व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो.
World Deadliest Snake : सापांना जगातील सर्वाधिक विषारी प्राणी मानले जाते. जगात हजारो प्रजातिचे साप आढळून येतात. यापैकी काही साप अत्यंत विषारी असतात. अशातच विषारी सापाने व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
आयलॅश वाइपर
आयलॅश वायपर जगातील सर्वाधिक विषारी साप मानले जाते. याशिवाय आयलॅश वायपर (Eyelash Viper) सर्वाधिक वेगाने व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी ओखळला जातो. खरंतर, आयलॅश वायपर सापाचे विष एवढे विषारी असते की, हल्ला केल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
साप चावल्यानंतर शरिरात रक्ताच्या गुढळ्या तयार होतात
a-z-animals.com च्या रिपोर्ट्सनुसार, आयलॅश वायपर अत्याधिक विषारी असतात. आयलॅश वायपर चावल्यानंतर व्यक्तीच्या शरिरात वेगाने विष पसरले जाते. अशातच वेळीच उपचार मिळणे आवश्यक असते. आयलॅश वायपरचे विष हेमोटॉक्सिक असते. म्हणजेच, शरिरात विष पसरले गेल्यास रक्ताच्या गुढळ्या तयार होऊ लागतात. यामुळेच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
पिवळ्या रंगासह अन्य रंगांमध्ये आढळतो आयलॅश वायपर
आयलॅश वायपरचे साइंटिफिक नाव ब्रोथीचिस श्लेगेली (Bothriechis schlegelii) आहे. हे साप आकाराने लहान आणि विषारी असतात. 2.5 फूट लांब असलेले आयलॅश वायपर साप पिवळ्या रंगासह गुलाबी, हिरव्या रंगातही आढळून येतात. कधीकधी सापाच्या अंगावर गडद रंगाचे डागही असतात. यामुळे आयलॅश वायपरला व्यक्तीवर हल्ला करण्यास सोपे जाते.
आणखी वाचा :
Google Maps लवकरच लाँच होणार धमाकेदार फीचर, इंटरनेटशिवायही शेअर करता येणार लोकेशन