Health Tips : आपल्या शरीरातील हाडांना मजबूत ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा !

हाडे मजबूत असणे निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. वाढत्या वयाबरोबर हाडांची झीज झाल्यामुळे किंवा स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर हाडांच्या अनेक तक्रारी होत असतात. तसेच अयोग्य आहार,व्यायाम न करणे यांमुळेही हाडे ठिसूळ बनणे,अशा अनेक तक्रारी होऊ लागतात.

Ankita Kothare | Published : Apr 21, 2024 6:28 PM IST

हाडे मजबूत असणे निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. वाढत्या वयाबरोबर हाडांची झीज झाल्यामुळे किंवा स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर हाडांच्या अनेक तक्रारी होत असतात. तसेच अयोग्य आहार घेणे, व्यायाम न करणे यांमुळेही हाडे ठिसूळ बनणे, हाडे सहज फ्रॅक्चर होणे, सांधेदुखी अशा अनेक तक्रारी होऊ लागतात.त्यासाठी काही घरगुती उपाय देखील आपण करू शकतो यामध्ये आहारात बदल करणे आणि व्यायाम करणे एवढे केल्याने देखील हाडांचे आरोग्य जपले जाईल.

हाडे मजबूत होण्यासाठी आहार :

दूध व दुग्धजन्य पदार्थ –

दुधामध्ये कॅल्शियम पुरेस असते. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी दररोज कपभर दुधाचा आहारात समावेश असावा. दुधामध्ये प्रोटीनही भरपूर असल्याने मांसपेशींच्या आरोग्यासाठीही ते उपयोगी आहे. याशिवाय दुधाचे पदार्थ म्हणजे दही, लोणी, तूप, ताक, पनीर यामुळेही भरपूर कॅल्शियम मिळत.

बदाम –

बदाममध्ये कॅल्शियम, प्रोटीन असे अनेक उपयुक्त घटक असतात. एक कप बदाममध्ये 450 mg कॅल्शियम असते. बदाम आपल्या हाडांबरोबरच हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असतात. याशिवाय सुके अंजीर, काजू, शेंगदाणे हेसुद्धा हाडांसाठी उपयोगी असतात.

हिरव्या पालेभाज्या –

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D साठी आहारात विविध हिरव्या पालेभाज्या खाव्यात. पालक, ब्रोकोली, शतावरी यांमध्ये कॅल्शियम मुबलक असते.

तीळ आणि मेथीच्या बिया –

तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. 100 ग्रॅम तिळामधून 975 mg कॅल्शियम मिळते. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी आहारात तिळाची चटणी समाविष्ट करावी. याचप्रमाणे मेथी बियांचा वापरही आहारात करू शकता. मेथीच्या बियांमध्येही कॅल्शियम भरपूर असते.

मांसाहार

हाडांच्या मजबूतीसाठी आहारात मांस, मासे, अंडी यांचा समावेश करू शकता. यामध्येही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D असते. याशिवाय बकऱ्याच्या पायापासून बनवलेला पायासुप कॅल्शियम वाढवण्यास उपयुक्त ठरतो.

हाडांचे आरोग्य जपण्यासाठी कोणता व्यायाम करावा :

हाडांच्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणेही गरजेचे असतो. व्यायामात रोज चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, दोरीउड्या, पायऱ्या चढणे-उतरणे, मैदानी खेळ आणि विविध योगासने यांचा समावेश करू शकता.

Share this article