थंडीत हिमालयाची ट्रिप होईल अविस्मरणीय, पण लक्षात ठेवा या गोष्टी

Published : Dec 30, 2024, 08:48 AM ISTUpdated : Dec 30, 2024, 08:49 AM IST
Winter Travel Bag Pack

सार

थंडीच्या दिवसात काहीजणांना अ‍ॅडव्हेंचर ट्रिप करण्याची फार आवडत असते. अशातच हिमालयात किंवा अन्य थंड हवेच्या ठिकाणी ट्रेकला जाण्याचे प्लॅन केले जातात. पण यावेळी ट्रिपची मजा घेण्यासह काही गोष्टींकडेही लक्ष देणे फार गरजेचे आहे. याबद्दलच जाणून घेऊया...

Winter Mountain Travel Essentials : हिमालयात सध्या थंडीच्या दिवसात सातत्याने बर्फवृष्टी सुरू आहे. हिमाचल ते उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि सिक्किमच्या ठिकाणी बर्फाची चादर पसल्याचे दृश्य पहायला मिळेल. येथील तापमानाचा पार -5 अंश डिग्री सेल्सिअसच्या खाली देखील जात आहे. याच स्थितीत तुम्ही हिमालयातील पर्वतरांगावर ट्रिप करण्याचा प्लॅन करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या ट्रिपची मजा बिघडण्यासह धोकादायक ठरू शकते.

नॅव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टिम

बऱ्याचदा हिमालयाच्या ठिकाणी नेटवर्कची समस्या उद्भवली जाते. यामुळे तुमच्याकडे तेथील नकाशा किंवा कंपास असावे. याशिवाय जीपीएस डिवाइस आणि मोबाइलमध्ये ऑफलाइन मॅप असावा. ट्रिपला निघण्यापूर्वी फोन, पॉवर बँक चार्ज करून घ्यावी.

स्पेशल कपडे आणि शूज

पर्वतांच्या ठिकाणी थंडी भयंकर असते. येथील पाणीही काही सेकंदात गोठले जाते. अशातच कडाक्याच्या थंडीपासून दूर राहण्यासाठी वुलनचे जॅकेट असावे. याशिवाय वॉटरप्रुफ किंवा विंडप्रुफ जॅकेट्स, पॅंट, ट्रेकिंगसाठी स्पेशल बूट्स असावेत. यामुळे कडाक्याच्या थंडीत तुमचे संरक्षण होईल.

अन्नपदार्थ आणि पाणी सोबत ठेवा

काहीवेळेस कमी ऑक्सिजनच्या स्थितीमुळे काहींचा बीपी फार कमी होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होते. यामुळे हिमालयातील ट्रिपसाठी बॅग भरताना हाय एनर्जी फूड्स भरा. याशिवाय नट्स आणि पाण्याची बॉटल सोबत ठेवा. ट्रेकदरम्यान कॅम्प करण्याचा विचार असल्यास स्लिपिंग बॅगसोबत असू द्या. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे मेडिसिन किटही बॅगेत भरा.

त्वचेची काळजी घेण्यासाठी खास प्रोडक्ट्स

कडाक्याच्या थंडीत त्वचेची काळजी घेण्यासाठी बॅगेत काही खास प्रोडक्ट्स आधीच भरा. जसे की, मॉइश्चराइजर, लिप बाम. यामुळे त्वचा थंडीतही मुलायम राहण्यास मदत होईल.

आणखी वाचा : 

2025 च्या पहिल्याच दिवशी Siddhivinayak दर्शन ते आरतीच्या वेळा, वाचा

पणजीपासून 60KM दूर आहे देशातील सर्वाधिक मोठा झरा, पाहून प्रेमात पडाल

PREV

Recommended Stories

थंडीत हि ज्वेलरी घालून लग्नात करा हवा, स्वेटर-शॉलवर घाला फॅन्सी डिझाइन
पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!