या 5 सवयींमुळे सुधारेल मानसिक आरोग्य, तणावही राहिल दूर

Published : Dec 30, 2024, 07:58 AM IST
Overthinking, stress

सार

फिजिकल हेल्थसह मानसिक आरोग्य सुदृढ राहणे फार महत्वाचे असते. तरच व्यक्ती उत्तम निर्णय घेऊ शकतो. सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक काळात कमी वयातील व्यक्तींमध्येही तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. 

5 habits to stay away from mental problems : मानसिक आरोग्य संतुलित नसल्यास त्याचा पर्सनल ते प्रोफेशनल आयुष्यावर परिणाम होतो. ज्यावेळी तुम्ही मानसिक रुपात त्रस्त असता तेव्हा याचा परिणाम शारिरीक आरोग्यावरही होतो. यामुळे वजन कमी होणे, भूक न लागणे, पोटात दुखत राहणे, नेहमीच थकवा जाणवणे, डोके दुखी अशा समस्या उद्भवू लागतात. धावपळीच्या काळात शरिराला आराम देण्याचीही फार गरज असते. जाणून घेऊया मानसिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो कराव्यात याबद्दल सविस्तर...

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे?

तणावाच्या स्थिती काहीजण हलक्यात घेतात. पण या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे नैराश्य येणे किंवा एकटेपणाची भावना कधी निर्माण होईल हे सांगता येत नाही. तणावाचा मानसिक आणि शारिरीक आरोग्यावरही फार मोठा परिणाम होऊ शकतो. यापासून दूर राहण्यासाठी पुढील काही गोष्टी करा.

गाणी ऐका

संगीत थेरपी मानसिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी फार मदत करते. यामुळे मनात येणारे नकारात्मक विचार दूर राहतात. यासाठी तुमच्या आवडीची गाणी ऐका.

मेडिटेशन करा

मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मेडिटेशन करा. दररोज अर्धा तास मेडिटेशन करावे.

ब्रीदिंग एक्सरसाइज करा

ब्रीदिंग एक्सरसाइज केल्याने तणाव, एंग्जायटी कमी होण्यास फार मदत होते. राग आल्यास किंवा तणावावेळी दीर्घ श्वास घेणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय ब्रीदिंग एक्सरसाइजही करू शकता.

वॉकसाठी जा

तणावापासून दूर राहण्यासाठी आणि काही समस्यांचा विसर पडण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात वॉकसाठी जा. दररोज काही न बोलता तुमच्या पसंतीचे गाणी ऐका. यावेळी ब्रीदिंग एक्सरसाइजही करू शकता.

दररोज योगाभ्यास करा

दररोज योगाभ्यास केल्याने फिजिकली हेल्दी राहण्यासह मानसिक आरोग्यही सुधारले जाते. यामुळे तणावाची स्थिती दूर राहण्यास मदत होते.

आणखी वाचा : 

रात्रीच्या वेळी शांत झोप येण्यासाठी काय करावं, उपाय जाणून घ्या

थायरॉइड राहिल नियंत्रणात, करा हे सोपे आणि घरगुती उपाय

PREV

Recommended Stories

पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!
iPhone Air चा राहू काळ काही संपेना, आधी विक्री घटली, आता रिसेल व्हॅल्यूही कोसळली!