आजकाल मोबाईलशिवाय आपलं पानही हलत नाही. उठता-बसता, कुठेही गेलो तरी आपण फोन स्क्रोल करत असतो. पण जेवताना मोबाईल वापरण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे की वाईट? यामागचं धक्कादायक सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
आजकाल अनेक जण जेवताना किंवा नाश्ता करताना फोनचा खूप वापर करतात. लहान मुले असोत किंवा मोठे, जेवताना फोन वापरल्यास नुकसान नक्कीच होणार. डॉक्टरांच्या मते, जेवताना फोन वापरणे हे एक व्यसन बनले आहे. याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. तुम्हीही असं करत असाल, तर भविष्यात तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
24
शरीरावर वाईट परिणाम, सर्वात आधी लठ्ठपणा
विज्ञानानुसार, पोट आणि मेंदूचा थेट संबंध असतो.
जेवताना पोट भरल्याचा संदेश पोटातून मेंदूकडे जातो.
जेवायला सुरुवात केल्यानंतर २० मिनिटांनी हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो.
पण आपण सतत मोबाईल बघत राहिलो, तर मेंदू आणि पोटाचा संपर्क तुटतो.
विज्ञानाच्या भाषेत याला 'माइंडलेस इटिंग' (Mindless Eating) म्हणतात.
मोबाईल वापरत जेवल्यामुळे आपण भुकेपेक्षा ३० ते ४० टक्के जास्त जेवतो.
आपल्याला हे समजतही नाही आणि आपण अन्न नीट न चावता तसेच गिळतो.
यामुळेच आपल्या पोटाची चरबी आणि लठ्ठपणा वाढतो.
34
पचनसंस्थेवर होतो थेट परिणाम
आपली पचनक्रिया पोटात नाही, तर तोंडातूनच सुरू होते. आपण जेव्हा एखादा पदार्थ बघतो किंवा त्याचा वास घेतो, तेव्हा आपल्या तोंडात लाळ तयार होते. यासोबतच पोटात पचनासाठी आवश्यक असलेले एन्झाइम्स तयार होतात. पण मोबाईल वापरताना आपलं पूर्ण लक्ष स्क्रीनवर असतं, त्यामुळे ही प्रक्रिया नीट होत नाही. याचा परिणाम म्हणून पचनसंस्थेकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि आपण खाल्लेलं अन्न पचत नाही. यामुळे पोट फुगणे, गॅस यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात.
आपला मोबाईल टॉयलेट सीटपेक्षा १० पट जास्त घाणेरडा असतो. फोनच्या स्क्रीनवर अत्यंत धोकादायक बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव असतात, हे अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. आपण कितीही हात धुवून जेवायला बसलो, तरी फोनवरील घाण आपल्या शरीरात जातेच.
ई-कोलाय (E. coli) सारखे धोकादायक बॅक्टेरिया अन्नावाटे थेट आपल्या पोटात प्रवेश करतात. यामुळे आपण आजारी पडून अंथरुणाला खिळू शकतो. त्यामुळे जेवणाच्या खोलीतून मोबाईल नेहमी दूर ठेवा. फक्त २० मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून जेवा आणि निरोगी राहा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.